Bhandara Dairy Development Success: पशुधनाची आनुवंशिक गुणवत्ता सुधारून दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन कार्यक्रमात भंडारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात तब्बल ५७ हजार ७०५ जनावरांवर यशस्वी कृत्रिम रेतन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या या कामगिरीमुळे पशुधन वंशसुधारणेला गती मिळाली असून, भविष्यात दूध उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..पूर्व विदर्भात सध्या १६ लाख ९० हजार ३७८ गावठी पशुधन तर ३ लाख ६५ हजार ९८ संकरित पशुधनाची नोंद आहे. या पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च आनुवंशिक गुणवत्तेच्या रेत मात्रा पशुसंवर्धन विभागाकडून अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जातात..Artificial Insemination Storage: गोठित रेतमात्रांची योग्य साठवणूक.नागपूर येथील शासकीय गोठविलेले वीर्य केंद्रातून पूर्व विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यांना रेत मात्रांचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून जर्सी, साहिवाल, गीर, राठी, गवळाऊ या गाईंच्या तसेच नागपुरी म्हशीच्या रेत मात्रा पुरवल्या जातात. दुग्धोत्पादन वाढीसाठी राज्यात २०१० पासून कृत्रिम रेतन धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली. याअंतर्गत देशी गोवंशाच्या आनुवंशिक सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे..ग्रामीण भागातील पशुपालकांना गावपातळीवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने, फिरते पशुवैद्यकीय पथक आणि प्रशिक्षित कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांची मदत घेण्यात येत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, कृत्रिम रेतनाच्या उद्दिष्टपूर्तीत भंडारा जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून, गडचिरोली जिल्ह्याची कामगिरी तुलनेने सर्वांत कमी राहिली आहे..Livestock Conservation: लोकसहभागातून देशी जातींच्या संवर्धनाला चालना द्यावी : दीपा मुधोळ-मुंडे .कृत्रिम रेतनाचे फायदेपशुधनाची आनुवंशिक गुणवत्ता सुधारते.दूध उत्पादनात वाढ होते.उत्तम दर्जाची संतती मिळते.संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते..कृत्रिम रेतनाचे महत्त्व तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यात आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात चांगली कामगिरी केली आहे. भंडारा जिल्ह्याने राज्यासाठी आदर्श निर्माण केला आहे. डॉ. सतीश राजू, सहआयुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन विभाग, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.