Farmer Subsidy Schemes: भंडारा जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अद्याप १,५०३ शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे..जिल्ह्यात आतापर्यंत २,२७२ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असून एकूण ६,१७९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ४,०४० शेतकऱ्यांनी आवश्यक रक्कम भरली आहे. असे असतानाही लाभ देण्याच्या प्रक्रियेत अडथळे कायम असल्याचे दिसून येते..Solar Pump Scheme: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सौर पंपांच्या प्रतीक्षेत.योजनेत सातबारा उताऱ्याची सक्ती ही प्रमुख अडचण ठरत आहे. वनहक्कधारक किंवा वनजमिनीवर शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे अधिकृत सातबारा नसल्यामुळे ते योजनेपासून वंचित राहत आहेत. शासनाच्या निकषांमुळे या शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत..Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?.दरम्यान, जिल्ह्यातील नवखे आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. सौर पंप मिळाल्यास सिंचन सुलभ होऊन उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सौर कृषी पंप योजनेचा विस्तार होत असला तरी प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे..आम्ही अनेक दशकांपासून वन जमिनीवर शेती करतो. मात्र सातबारा नसल्यामुळे आम्हाला योजनेपासून दूर ठेवणे अन्यायकारक आहे. सौर पंप मिळाल्यास सिंचनाची समस्या सुटून उत्पादन वाढेल. प्रशासन आणि महावितरणने वनहक्कधारक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र, सुलभ कार्यपद्धती तयार करावी.” असे भीमराव मेश्राम, शेतकरी म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.