Bhandara Panchayat: भंडाऱ्याच्या महालगाव-मोरगाव (ता. मोहाडी) ग्रामपंचायतीची २७ ऑगस्ट रोजी प्रस्तावित ग्रामसभा प्रत्यक्षात ७ सप्टेंबरला झाली. मात्र, ग्रामसभा झाल्याची १७ ऑगस्टची तारीख दर्शविणाऱ्या पत्रात खोडतोड करून ते पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा आरोप उपसरपंच सूर्यकांता ढबाले यांनी केला आहे. .याप्रकरणी संगणक ऑपरेटर रवी ढबाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. उपसरपंच ढबाले यांनी ९ सप्टेंबरला सरपंच व ग्रामसचिवांकडे लेखी तक्रार केली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला सरपंच प्रीती उईके, उपसरपंच सूर्यकांता ढबाले, ग्रामपंचायत सदस्य मीना बांडेबुचे, पंढरी अतकरी, माजी सदस्य ईश्वर ढबाले आणि उमेश बोराडे उपस्थित होते..Gram Panchayat Officials: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना हजेरीचे बंधन.७ सप्टेंबरला झालेल्या ग्रामसभेत विषयपत्रिका वाचून दाखविण्यात आली. तसेच सोळाव्या वित्त आयोगाच्या आराखड्यावर चर्चा करून विकासकामांचे नियोजन करण्यात आले. ही सभा तहकूब सभेच्या स्वरूपात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, १७ ऑगस्टला ग्रामसभा झालेली नसतानाही त्या तारखेची नोंद असलेले पत्र तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे..संगणक ऑपरेटर कार्यालयीन गुप्त माहिती मोबाइलद्वारे प्रसारित करून चुकीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय कार्यालयात नियमित गैरहजर राहणे, ग्रामपंचायतीची कामे वेळेत न करणे आणि सरपंच व सदस्यांनी दिलेल्या कामांकडे दुर्लक्ष करणे, असेही आरोप करण्यात आले आहेत. संबंधित ऑपरेटरवर तातडीने कारवाई करून नवीन संगणक ऑपरेटर नियुक्त करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे..Khadi Board Employee Shortage : आकृतिबंधातून आवश्यक मनुष्यबळ मिळण्याची आशा; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती साठे यांची माहिती.विशेष म्हणजे, सोळाव्या वित्त आयोगाचा निधी अद्याप ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नसला, तरी ७ सप्टेंबरच्या ग्रामसभेत आराखडा तयार करून विकासकामांचे नियोजन करण्यात आल्याचे उपसरपंचांनी स्पष्ट केले. त्यामुळे १७ ऑगस्टच्या पत्रातील नोंदीबाबत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे..ग्रामसभेच्या नोटिशीमध्ये कोणतीही खोडतोड केलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच ग्रामसभेची नोटीस काढण्यात आली. तसेच, मी ग्रामसभेची कोणतीही नोटीस समाजमाध्यमावर प्रसारित केलेली नाही.रवी ढबाले, संगणक ऑपरेटर.कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष१७ ऑगस्टच्या पत्रातील नोंद, ७ सप्टेंबरला झालेली प्रत्यक्ष ग्रामसभा आणि समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या पत्राबाबत ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.