Rural Economy: निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पान बाजारात आवक घटल्याने आज जुनवानच्या पानांना उच्चांकी भाव मिळाला. फपड्याच्या पान डागाला (सहा हजार पानांना) तब्बल तेरा हजार रुपये, तर कळीच्या पान डागाला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला..आज भरलेल्या पान बाजारात कळी व फपड्याचे ४० डाग तर गबाळ व सरपटचे १०० डाग विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले होते. कळी व फपड्याच्या पान डागांना मागील वर्षाच्या तुलनेत चार ते पाच हजार रुपये जास्त भाव मिळाला. .Vegetable Market: शेतकऱ्यांचे बांदा येथे भाजीपाला-फळविक्री केंद्र.मागील वर्षी गबाळ व सरपटच्या पान डागाला चारशे रुपये मिळणारा भाव आज एक ते तीन हजारापर्यंत गेला. .Gavaran Chillies: पारोळा येथील बाजारात गावरान मिरचीला मागणी.जुनवानची खरेदी केलेली पाने राजकोट, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी तर गबाळ व सरपटची पाने स्थानिक बाजारात पाठवली जातात असे व्यापाऱ्यांनी सांगितले..यंदा सततच्या पावसामुळे पानवेलींना मुळकूज झाल्यामुळे चाळीस ते पन्नास टक्के पाने पिवळी पडून गळून पडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उच्चांकी भावाने पाने विकली जात असल्याने आर्थिक नुकसान टळले आहे.- पोपट पिसाळ, पान उत्पादक शेतकरी, गोतोंडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.