डॉ. श्रीकांत खुपसेRabi Chara Pike: दुष्काळाच्या दृष्टीने पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात येणारे रब्बी मका, ओट, बरसीम आणि लसूणघास या चारा पिकांची लागवड शेतकरी करु शकतात. परंतु ही लागवड करताना योग्य वाणाची निवड, पाण्याची आणि जमिनीतील ओलाव्याची उपलब्धता तपासणे गरजेचे आहे. .मकामका हे एकदल पीक असल्याने ऊर्जा पुरवणारे महत्त्वाचे चारा पीक आहे. रब्बी हंगामात सिंचनाची सोय असल्यास मक्याची लागवड करुन कमी कालावधीत भरपूर हिरवा चारा मिळवता येतो. मक्याची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये केली जाते. मध्यम ते भारी आणि चांगली निचरा होणारी जमीन शेतकऱ्यांनी निवडावी. रब्बी मक्यासाठी आफ्रिकन टॉल हे शिफारस केलेले चारा वाण आहे. या पिकाची कापणी ६० ते ७५ दिवसांनी केली जाते. या चाऱ्याची हेक्टरी उत्पादनक्षमता २५ ते ४० टन इतकी मिळते. मका पिकाला पाण्याची गरज मध्यम असते. पाण्याच्या जवळपास २ ते ३ पाळ्या यात द्याव्या लागतात. त्यामुळे पाण्याची उपलब्धता तपासून शेतकऱ्यांनी मका पीक घ्यावे..Oat Fodder Crop: रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडिच महिन्यात पहिली कापणी!.ओटओट हे थंड आणि दमट हवामानात चांगले वाढते. ओटचा चारा रुचकर असून दुधाळ जनावरांच्या आहारात त्याचा चांगला उपयोग होतो. ओटची कापणी अनेक वेळा करता येते. यासाठी केंट, एचएफओ ११४, एचएफओ ६०७, जेएचओ ८५१, ओएल ९ आणि ओएस ६ हे वाण वापरावे. ओट चारा पिकाची पहिली कापणी ५० ते ६० दिवसांनी करता येते आणि एकूण २ ते ३ कापण्या घेता येतात. ओटची हेक्टरी उत्पादनक्षमता ३० ते ६० टन इतकी मिळते. ओट चारा पिकालाही पाण्याची मध्यम आवश्यकता असते. त्यामुळे दुष्काळात पाणी मोजून ओट लावावे..Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर.बरसीमबरसीम हे प्रथिनेयुक्त, रुचकर आणि बहुकापणी चारा पीक आहे. त्याच्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे दुधाळ जनावरांसाठी बरसीम अतिशय फायदेशीर ठरु शकते. या पिकाच्या वरदान, जवाहर बरसीम, जेबी ०५-६ आणि जेएचबी १४६ या वाणांची शिफारस केली आहे. बरसीमची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करता येते. याच्या एकून ४ ते ६ कापण्या घेता येतात. बरसीमची हेक्टरी उत्पादनक्षमता ५० ते ७० टन इतकी मिळते. बरसीमच्या कापण्या जास्त मिळत असल्याने आणि पाणीही मध्यम स्वरुपात लागत असल्याने शेतकऱ्यांनी त्याची लागवड पाण्याची उपलब्धता तपासून करावी..लसूणघासलसूणघास हे प्रथिनायुक्त आणि बहुवार्षिक चारा पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवडीपासून त्याच्या अनेक कापण्या घेता येतात. लसूणघासाच्या आनंद २ आणि आरएल ८८ या वाणांची शिफारस केली जाते. प्रत्येक कापणी जमिनीच्या अगदी जवळ न करता योग्य उंचीवर करावी, जेणेकरुन पुन्हा चांगले फुटवे फुटतील. या पिकाची पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी मिळते. या पिकाच्या ६ ते ८ किंवा त्यापेक्षा जास्त कापण्या घेता येतात. लसूणघासचे हेक्टरी उत्पादन ६० ते १३० टन प्रति वर्ष मिळते. या चारा पिकात प्रथिने जास्त असतात. परंतु पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याचा अंदाज बांधूनच लागवड करावी..चारा उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीचारा पिकाची योग्य हंगामात वेळेवर पेरणी करायची.तज्ज्ञांनी शिफारस केलेले सुधारित आणि दर्जेदार वाण वापरावे.जमिनीची तयारी करताना योग्य मशागत करावी. पाण्याचा निचरा चांगल्याप्रकारे होणारी असणारी जमीन निवडावी.माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा.गरजेनुसार सिंचन करावे.दीर्घकाळ चाऱ्याची उपलब्धता रहावी यासाठी टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.अतिरिक्त चाऱ्याचा मुरघास तयार करुन ठेवावा.हिरवा चारा, सुका चारा,पशुखाद्य आणि खनिज मिश्रणाचा वापर करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.