Indoor Saffron Farming: काश्मीरच्या उंच पर्वतराजीत केशर पीक घेतले जाते. खाद्य पदार्थ्यांत स्वाद आणणे, सौंदर्य प्रसाधनांत वापर करण्यासाठी त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. आता शहरातही अशी शेती केली जात आहे. विशेषतः बंगळूरमध्ये नियंत्रित वातावरणातील म्हणजेच इनडोअर केशर शेती हा नवीन ट्रेंड बनला आहे. येथील ३० हून अधिक लोकांनी अशापद्धतीने केशर उत्पादन सुरू केले आहे. केशर पीक हे सामान्यतः डोंगराळ अथवा पर्वतीय प्रदेशात घेतले जाते. बंगळूरमध्ये हे सगळे नसले तरी येथील उंची आणि अनुकूल हवामान केशरसाठी पोषक असल्याचे कर्नाटक केशर शेतकरी संघटनेचे (KSFA) म्हणणे आहे..कर्नाटकातील बंगळूर व्यतिरिक्त, अशा पद्धतीने बंद खोलीत नियंत्रित वातावरणात शृंगेरी, कुनिगल आणि तुमकूर येथेही केशर उत्पादन घेतले जाते. केशरचे उत्पादन घेणारे दिवसा नोकरीही करतात. यातील बहुतांश जण शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आमच्यातील बरेचजण सध्या माहिती तंत्रज्ञान (IT), जैवतंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि संशोधन यासारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रात काम कार्यरत आहेत. काहीजण कृषी आणि फलोत्पादन विभागात डॉक्टर अथवा अधिकारी म्हणूनही काम करत आहेत, असे कर्नाटक केशर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सांगतात..Saffron Farming : केशरच्या यशस्वी उत्पादनातून तयार झाला ब्रॅण्ड.हे चित्र जरी आशादायी वाटत असले तरी, बंगळूर हे या पिकासाठी नैसर्गिक ठिकाण नाही. आर्थिक, स्थानिक आणि तात्पुरत्या स्वरुपात खूप कमी लोकांना अशा पद्धतीने नियंत्रित वातावरणात शेती करणे परवडते. केशर शेतीत फुले येण्याची अवस्था हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तापमान, आर्द्रता अथवा प्रकाशातील थोडासा चढ-उतारदेखील उत्पादनावर परिणाम करू शकतो. अशी शेती करताना आणखी एक मोठे आव्हान म्हणजे दर्जेदार केशर कंदांची उपलब्धता आणि त्याची किंमत आहे. सध्या, कंद काश्मीरमधून आणावे लागतात. गेल्या पाच वर्षांत, त्यांचा दर प्रति किलो सुमारे २५० रुपयावरून २ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत वाढला असल्याचे केशर उत्पादक सांगतात. .Saffron Farming : महागड्या केशरची शेती कशी केली जाते? .यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी, फलोत्पादन विभाग आणि संशोधन संस्था खूप कमी आहेत. दर्जेदार कंद आणि पर्यावरणीय नियंत्रणाच्या खात्रीनंतर अशी शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. परंतु सुरुवातीची गुंतवणूक, सरकारकडून मदत न मिळणे आणि तांत्रिक आव्हाने या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नवीन शेतकऱ्यांसमोरील प्रमुख अडथळे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. .कर्नाटक केशर शेतकरी संघटनेच्या माहितीनुसार, केशरचा वापर स्वादिष्ट पेये, चीज, कुकीज, चॉकलेट, सौंदर्य प्रसाधने आणि इतर अनेक पदार्थांत केला जातो. विशेषतः शहरातील बाजारांत याची मागणी वाढत आहे. सामान्यपणे बाजारात विकले जाणारे बहुतांश केशर हे भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यामुळे लोक शुद्ध आणि स्थानिक पातळीवर उत्पादन घेतलेल्या केशरचा शोध घेतात. सध्या, शुद्ध केशरचा दर प्रति ग्रॅम सुमारे २ हजार एवढा आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.