Pune News: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाइलद्वारे मिळणार आहेत. त्यासाठी महामंडळाच्या वेब प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे..विविध ठिकाणी एजंटांकडून लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. नाशिक व अहिल्यानगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी महामंडळाच्या वेब प्रणालीचे अद्ययावतीकरणाचे काम सुरू असून, चॅट जीपीटी, स्मार्ट बॉट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यातून विविध ठिकाणी एजंटांकडून महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती दिली जाणार आहे..Annasaheb Patil Scheme: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा दीड लाख तरूणांना लाभ.एजंटांमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी, यासाठी महामंडळाने कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे (सीएससी) अल्पशुल्कात सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी करारही केला असून, लाभार्थ्यांना सुरळीत व सहज व्याज परतावा मिळणार आहे. योजनेतील काही व्यवसायातून अपेक्षित स्वयंरोजगारनिर्मिती होत नाही, अशा व्यवसायांबाबतचा योग्य निर्णय संचालक मंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे..Annasaheb Patil Scheme : बँकांनी लाभार्थ्यांची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत : पाटील.अफवांवर विश्वास ठेवू नकाकाही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे कामकाज बंद आहे. व्याज परतावा थांबवला आहे, अशा अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत..त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहे, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.