Beed News: बीड जिल्ह्यातील धारूर व वडवणी तालुक्यात सोमवारी (ता.२३) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली आहेत. .गहू, हरभरा, ज्वारी, मोहर आदी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून मोहोर गळून पडला आहे. धारूर तालुक्यातील चिंचपुरे, गांजपूर, धारूर शहर, आरणवाडी, चोरांबा, आंबेवडगाव, गावदरा आदी भागांत तासभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग अधिकचा असल्याने उभ्या पिकांची अक्षरशः माती झाली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे..Unseasonal Rain: आरगावसह चार गावांत वादळी पाऊस.वडवणी तालुक्यातील डोंगर भागातील चिंचवन, कोठारबन, सोन्ना-खोटा, पिंपळटक्का, खाडेवाडी आदी गावातील शेतीपिकांना फटका बसला. शेतातील ज्वारी, बाजरी, गहू हरभरा, टरबूज-खरबूज, कांदे, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली..Unseasonal Rain: विदर्भासह मराठवाड्यात गारपीट.रविवारी व सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हरभरा समवेत ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करत मदत जाहीर करावी.- अशोक जगताप, शेतकरी.शेतकऱ्यांनी अफाट मेहनत व खर्च करून गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, भाजीपाला आदी पीक जोमात आणली होती. अवकाळी पावसाने सर्व पिके जमीन उद्ध्वस्त केले. या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- दत्ता वाकसे, मल्हार ब्रिगेड, राष्ट्रीय अध्यक्ष.मला पाच एकर जमीन आहे. दीड एकर गहू, दोन एकर बाजरी, एक एकर ज्वारी होती. महागामोलाचे खतं, बी-बियाणे खरेदी करत चांगली मेहनत केली होती. काल झालेल्या वादळी वाऱ्याने सगळ मातीत मिसळले. शासनाने मदत करावी.- योगेश मात्रे, शेतकरी, चिंचवण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.