Beed Farmers Protest Over Sugarcane Rates: ऊस दरावरुन बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांचे बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे टोलनाका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. .उसाला प्रतिटन ३,५०० रुपये दर मिळावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी. चारा छावण्या सुरु कराव्यात, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी रविराज साबळे आणि विवेकानंद पाटील रस्त्यावर उतरले. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे..Sugarcane Price: ऊसाला साडेसात हजार दर द्या; अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही : रघुनाथदादा पाटील.बीड जिल्ह्यात उसाला प्रतिटन २,८०० रुपये ते जास्तीत जास्त ३ हजार रुपये दर मिळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडून ४ हजार रुपये दर दिला जात आहे. ही तफावत कशासाठी? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. हा दर बीडमधील शेतकऱ्यांना मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. .Sugarcane Price Demands: सोमेश्वर कारखान्याने उसाला चार हजार रुपये उचल द्यावी.जोपर्यंत आमच्या मागण्यांवर लेखी आश्वासन मिळत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. गेल्या काही तासांपासून सुरु राहिलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनात शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.