Beed News: बीड जिल्ह्यात मागीलवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व महापुराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या ‘पोस्ट डिजास्टर नीड्स असेसमेंट’ (पीडीएएनए) : पुरानंतर झालेल्या नुकसानीची उपाययाोजना करण्यासाठी आवश्यक गरजांच्या अहवालासाठी केंद्राच्या आपत्ती निवारण विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने बुधवारी (ता. ११) जिल्ह्याचा दौरा केला..पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने बीड, गेवराई व शिरूरकासार तालुक्यांत पाहणी केली. या पथकासोबत उपविभागीय अधिकारी कविता जाधव होत्या. .Crop Damage Inspection : नुकसानीनंतर नेते पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर.अतिवृष्टीमुळे विविध भागांत झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो. एम. विनोथ, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के या पाच केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कविता जाधव यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांसह गेवराई शहर तसेच या तालुक्यातील धोंडराई येथे पाहणी केली..Flood Damage : वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे अजूनही उरकेनात.टाकळगव्हाण येथील उच्च पातळी बंधाऱ्याच्या नुकसानीची, बीड तालुक्यात पावसामुळे खचलेल्या व वाहून गेलेल्या जमिनींची व त्यानंतर शिरूरकासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब, सावरगाव चकला येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी केली..या भेटीदरम्यान कृषी, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी क्षेत्रांतील नुकसानीचा आढावा घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.