Farmer Crisis: बीड, परळी, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, शिरूर कासार : पावसाने पूर्ण दांडी मारली... डोळ्यांसमोर पीक करपून चाललंय. पेरणीसाठी काढलेलं कर्ज कसं फेडायचं अन् लेकराबाळांच्या तोंडी घास कसा द्यायचा? असा आर्त टाहो बीड जिल्ह्यातील शेतकरी फोडत आहे. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि पावसाअभावी वाळून गेलेली उभी पिके पाहताना बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नाहीत. खरिपाची पूर्णपणे दाणादाण उडाल्याने, मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या अस्मानी संकटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, आता मायबाप सरकार तुम्हीच आम्हाला वाचवा, अशी विनवणी तो बांधावर आलेल्या प्रशासनाला आणि नेत्यांना करत आहे. राज्य शासनाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर, आता शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व मंत्री थेट बांधावर पोहोचले आहेत..शनिवारी (ता. २६) जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, परळी, अंबाजोगाई आणि शिरूर कासार यांसह अनेक दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी विविध शिवारांत जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी केली..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.माजलगाव आणि गेवराई तालुक्यातील रुई, धानोरा, शिरसदेवी परिसरात महिला शेतकऱ्यांनी गहिवरलेल्या आवाजात आपली कैफियत मांडली. पिकांची अक्षरशः दाणादाण उडाली असून हाती काहीच लागणार नाही. आमच्या लेकरा-बाळांसाठी, मुक्या जनावरांसाठी आता तुम्हीच आहात, तातडीने मदत करा, अशा शब्दांत महिलांनी अश्रू ढाळले. शेतकऱ्यांचे हे विदारक दुःख पाहून सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी सुद्धा मराठवाड्याचीच लेक आहे. तुमचे दुःख मला समजतं..Crop Loss Compensation: पीक नुकसानीची सरसकट भरपाई.लेकरांचं शिक्षण, जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी, हे सर्व प्रश्न सरकार सोडवणार आहे. दिवाळीच्या आधीच तुमच्या खात्यात थेट मदत पोहोचवली जाईल. संपूर्ण सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, तुम्ही धीर सोडू नका..पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून ैआधार दिला. संकट मोठे आहे, पण पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश धस यांनीही शिरूर कासार तालुक्यात पाहणी करत प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले..जिल्हाधिकारी ‘ग्राउंड झिरो’वर सक्रियशेतकऱ्यांना वेळेत आणि पारदर्शक मदत मिळावी, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन मागील दोन दिवसांपासून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर उतरून ग्राउंड झिरोवरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संपूर्ण महसूल आणि कृषी यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. जीपीएस छायाचित्रांसह पंचनामे करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.