Beed Rain Update: बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील ५२ मंडलांत शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलक्या, मध्यम ते दमदार पावसाची नोंद झाली. त्याचवेळी जालना जिल्ह्यातील आठपैकी सहा तालुक्यांतील काही मंडलांत तुरळक ते हलका पाऊस झाला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक-दोन मंडलांत झालेला हलका पाऊस वगळता बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी नव्हती..बीड जिल्ह्यात सरासरी ११.५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी १२.१ मिलिमीटर, पाटोदा ९.३, आष्टी २४.२, गेवराई ५.८, माजलगाव १७.६, अंबाजोगाई १०.६, केज ७.७, परळी १३.९, धारूर ८.५, वडवणी १.८ तर शिरूर कासार तालुक्यात सरासरी ३.२ मिलिमीटर पाऊस झाला. .Marathwada Rainfall: प्रदीर्घ खंडानंतर तीन जिल्ह्यांतील ६३ मंडलांत पाऊस.जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, घनसावंगी, मंठा, बदनापूर तालुक्यातील १९ मंडलात पावसाची हजेरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा झाला. जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पावसाचा थेंबही बरसला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक व कन्नड तालुक्यातील ३ मंडलांत ३.३ ते १३.३ मिलिमीटर दरम्यान झालेला पाऊस दखलपात्र राहिला..Rain Updates: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील बहुतांश मंडलांत हलका ते मध्यम पाऊस.जिल्हानिहाय पावसाची मंडल (पाऊस मिलिमीटरमध्ये)जालना जिल्हाजालना शहर ३२.८, जालना ग्रामीण ३२.८, नेर २१.५ रामनगर १३, अंबड २१.५, धनगर पिंपरी १२, श्रीष्टी १२, वाटूर १०.८, घनसावंगी १०.५, तीर्थपुरी २०.८, कुंभार पिंपळगाव २०.८ अंतरवाली टेंभी २०.८, रांजणी २१.५, पांगरी गोसावी २१.५..बीड जिल्हानेकनुर १९, पेडगाव १६.३, राजुरी नवगण १६, पाली १८.५, बीड ११.५, मांजरसुंभा १९, थेरला ११.५, पिंपळा २०.५, धानोरा ४६, धामणगाव २१.५, दौलावडगाव २०.५, टाकळसिंग ४८,कडा २२.५, सिरसदेवी १४.५, जातेगाव १४.५, गेवराई १५, पाचेगाव १०.३, दिंद्रूड २५.३, तालखेड १४.५, कीट्टीआडगाव २१, गंगामसला १५.५, माजलगाव २१, अंबाजोगाई १३.८, पाटोदा म १४.३, लोखंडी सावरगाव १४.३, घाटनांदुर ११, विडा १७.५, केज ११.५, परळी २०.५, नागापूर २०.५, सिरसाळा २०.५, मोहखेड १४.८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.