India Basmati Rice Export To Iran Hit: भारतातून इराणमध्ये होणाऱ्या प्रीमियम बासमती तांदळाच्या निर्यातीबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध आणखी कडक केल्यावर इराणी चलनात झालेल्या निच्चांकी घसरणीनंतर ही समस्या उद्भवली आहे. इराणचे अधिकृत चलन रियाल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर घसरल्यामुळे इराण सरकारने अन्नधान्य आयातीवरील अनुदान थांबवले आहे. परिणामी, भारतीय निर्यातदारांना बासमती तांदळाचा पुरवठा थांबवावा लागला आहे. यामुळे किमान २ हजार कोटी रुपयांचा धान्यसाठा सध्या आंतरराष्ट्रीय बंदरांवर अडकून पडला आहे. हा धान्यसाठा इराणला पाठवण्यासाठी निर्यातदार परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त आहे..याचा पंजाब आणि हरियाणातील बासमती उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेला फटका बसला आहे. ही समस्या अमेरिकेने इराणवर निर्बंध कडक केल्यावर इराणी चलनात झालेल्या घसरणीनंतर निर्माण झाली आहे. .इराणच्या रियाल चलनात डॉलरच्या तुलनेत निच्चांकी घसरण झाली आहे. यामुळे इराण सरकारने अनेक वर्षे अन्नधान्य आयातीवर दिले जात असलेले अनुदान पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला आहे. यामुळे निर्यातदार व्यापार सुरू ठेवण्यास इच्छूक नाहीत, असे पंजाब राइस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे..India Rice Trade: जगातील तांदूळ व्यापारात भारताची आघाडी, पण जलसंकटाचीही भीती, नवीन निष्कर्ष काय सांगतात?.याआधी भारत आणि इराणमधील व्यापारात वस्तू-विनिमय (बार्टर सिस्टीम) पद्धत वापरली जात होती. यामुळे व्यापार सुलभ होत होता. पण भारताने इराणकडून तेल आयात करणे थांबवल्यानंतर ही पद्धत संपुष्टात आली. असे असतानाही इराणने भारतातून चहा, बासमती तांदूळ आणि औषधे यासारख्या वस्तूंची आयात कायम ठेवली. पण आता असे दिसते की ही आयातदेखील कमी केली जात असल्याचे निर्यातदार सांगतात..इराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. इराण भारतातून दरवर्षी सुमारे १२ लाख टन बासमती तांदूळ आयात करतो. याचे मुल्य सुमारे १२ हजार कोटी इतके आहे. या एकूण आयातीपैकी जवळपास ४० टक्के बासमतीचा पुरवठा पंजाब आणि हरियाणा राज्यातून केला जातो. पण आता निर्यातीबाबत दीर्घकाळ राहिलेल्या अनिश्चिततेचा तांदूळ उत्पादक आणि गिरणीधारकांवर फटका बसला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास बासमती उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. .Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार.इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षापूर्वी, विनिमय दर प्रति अमेरिकन डॉलर सुमारे ९० हजार रियाल असा होता. त्यानंतर रियाल चलनात आणखी घसरण झाली. परिणामी, इराणसाठी आयात मोठ्या प्रमाणात महाग होत गेली..बासमती तांदळाचा दर आधीच प्रतिकिलो ३ ते ४ रुपयांनी कमी झाला आहे, असे भात गिरणीधारकांचे म्हणणे आहे. बासमतीच्या १५०९ आणि १७१८ ह्या जाती लांब दाणे आणि त्यांच्या मोहक सुगंधासाठी ओळखल्या जातात. याचे पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इराणमधून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.