Drought Crisis: बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथेही केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.