Baramati Agriculture Weather Update: पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील जिरायती पट्टा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यात केवळ रिमझिम सरी कोसळल्यानंतर वरुणराजाने पुन्हा पाठ फिरवल्याने खरीप हंगामाची घडी विसकटली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..बाजरी, मका, तूर, मूग आदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी शेतांची मशागत करून पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. काही ठिकाणी मका पेरणीही झाली आहे. मात्र, पुरेशा पावसाअभावी जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने उगवण धोक्यात आली आहे. पावसाने आणखी विलंब केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे..Rain Shortage: खानदेशात मका पिकासाठी पावसाची प्रतीक्षा.कारखेल, उंडवडी कडेपठार, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, खराडेवाडी, बऱ्हाणपूर, जराडवाडी आदी परिसरातील जिरायती भागात सध्या प्रत्येकाची नजर आभाळाकडे लागली आहे. दिवसभर ढगांची चाहूल लागते; मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खरीप हंगामाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाऊस आणखी लांबल्यास शेतीचे संपूर्ण अर्थकारण कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे..दरम्यान, वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यासच खरीप हंगामाला उभारी मिळणार आहे. त्यामुळे बारामतीच्या जिरायती भागातील बळीराजा आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला असून, वरुणराजाने लवकरच कृपादृष्टी करावी, अशी आर्त प्रार्थना अनेक शेतकऱ्यांसह रशीद सय्यद यांनी केली आहे..Baramati Rain Update: बारामती तालुक्यात पावसाचा दिलासा अपुराच.दुबार पेरणीसह आर्थिक संकटपुरेसा पाऊस नसतानाही बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने महागडे बियाणे कोरड्या जमिनीत गाडले आहे. पुढील दोन-चार दिवसांत पाऊस झाला तर हे बियाणे उगवेल आणि खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, पाऊस आणखी लांबल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीसह आर्थिक संकटही उभे राहण्याची शक्यता आहे..पावसाळ्यात विहिरी, कूपनलिकांनी गाठला तळऐन पावसाळ्यातच या भागातील अनेक विहिरी आणि कूपनलिका तळ गाठू लागल्या आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही भीषण टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी दोघांचीही चिंता वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.