Pune News: ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजचा धोका वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी ‘रेबीजमुक्त गाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबत गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे अभियान तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत राबवले जाणार आहे. .या अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर देखरेख समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत..Rabies Treatment : रेबीजची लागण झाली तर काय कराल? .ग्रामपंचायतींना सदर समिती स्थापन करून याबाबतची प्रत संबंधित संस्था व तहसील कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. संस्थेच्या वतीने भालचंद्र महाडिक यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी याबाबत बारामती पंचायत समितीला प्रस्ताव सादर केला होता..गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाची अपुरी सोय आणि घंटागाड्यांचा अभाव यामुळे कचरा रस्त्यांवर पडून राहतो. पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या माळरानावर फेकल्या जातात, ज्यावर भटकी कुत्री पोसली जातात. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून ते पाळीव जनावरे आणि माणसांसाठी धोकादायक ठरत आहेत. .Animal Disease: रेबीज आजाराचा ओळखा धोका .विशेषतः पिसाळलेल्या (रेबीजग्रस्त) कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा ग्रामपंचायतींकडे नाही. तक्रार कोणाकडे करावी, हे ही ग्रामस्थांना माहीत नसते. रेबीज हा जीवघेणा रोग असून, लक्षणे दिसल्यानंतर त्यावर उपचार शक्य नसतात. हे रोखण्यासाठी अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रम प्रभावी ठरू शकतो, ज्यात स्टेरिलायझेशन आणि लसीकरणाचा समावेश आहे..ग्रामपंचायत स्तरावरील देखरेख समिती व स्वयंसेवी संस्थेचे पथक यांनी मिळून हा उपक्रम राबवायचा आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना सहकार्य करतील. डॉ. धनंजय पोळ, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, बारामती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.