Baramati Electricity Theft Penalty Cases: बारामती परिमंडळात महावितरणने वीजचोरीविरोधात राबविलेल्या मोहिमेत जुलैपासून १९ ऑगस्टपर्यंत १७५९ जणांवर कारवाई केली. यातील १३१० प्रकरणांत १२ लाख २७ हजार युनिट वीजचोरी उघडकीस आली असून, संबंधितांकडून २ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला..सोलापूर मंडळात १०८१ जणांवर कारवाई झाली. ७०८ प्रकरणांत ७ लाख ५ हजार युनिट वीजचोरी आढळून आली असून, १ कोटी ५९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. सातारा मंडळात २४५ जणांवर कारवाई करून २११ प्रकरणांत १ लाख ४० हजार युनिट वीजचोरी उघडकीस आली..Electricity Theft: पुण्यात वीज चोरट्यांना ठोठावला ८१ लाखांचा दंड.या प्रकरणांत २७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बारामती ग्रामीण मंडळात ४३३ जणांवर कारवाई करण्यात आली. ३९१ प्रकरणांत ३ लाख ८२ हजार युनिट वीजचोरी आढळली असून, संबंधितांकडून ८६ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला..Pump Cable Chori: पंपांची केबल चोरणाऱ्या दोन जणांना अटक.विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ नुसार अनधिकृत जोडणी, मीटरमध्ये छेडछाड, मीटरची अचूक नोंद होऊ नये यासाठी उपकरणांचा वापर किंवा छेडछाड केलेल्या मीटरद्वारे वीज वापरणे, या कृती वीजचोरीच्या कक्षेत येतात. अशा प्रकरणांत तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे..वीजचोरीची माहिती ‘महावितरण’ला द्यावीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच विद्युत यंत्रणेवर अनधिकृत भार पडतो. त्यामुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता व सुरक्षितता प्रभावित होऊन अपघात, आग आणि जीवितहानीचा धोका निर्माण होतो. नागरिकांनी वीजचोरी करू नये किंवा त्यास सहकार्य करू नये. अनधिकृत जोडणी अथवा वीजचोरीची माहिती संबंधित महावितरण कार्यालयास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.