Water Crisis: बारामतीतील तलाव कोरडेठाक; नारोळी, तरडोली, कोळोली परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती
Baramati Drought Situation: जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्यामुळे बारामती तालुक्यातील नदी, नाले आणि तलाव कोरडे पडले आहेत. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.