Sugarcane Crushing Season : पुणे जिल्ह्यात चालू ऊस गळीत हंगाम वेगात सुरू असून तो आता मध्य टप्प्यात आला आहे. सहकारी व खासगी असे एकूण १४ साखर कारखाने सध्या गाळप करत असून आतापर्यंतच्या ऊस गाळपात बारामती अॅग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली..पुणे जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले होते. त्यापैकी सुमारे दीड लाख हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या ९ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांची एकत्रित दैनंदिन गाळप क्षमता १ लाख २६ हजार टन इतकी आहे..Sugarcane Crushing Season: कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम मध्यावर.आतापर्यंत १४ कारखान्यांनी ७४ लाख २९ हजार ७२० टन ऊस गाळप करून ६६ लाख ९८ हजार ६३१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.०२ टक्के आहे. बारामती अॅग्रोने १३ लाख ९३ हजार ५२३ टन ऊस गाळप करून आघाडी घेतली असून, साखर उताऱ्यात ११.२५ टक्क्यांसह श्री सोमेश्वर साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपाने घेतला वेग.कारखानानिहाय ऊस गाळपाची स्थितीकारखाना ऊस गाळप साखर उत्पादनबारामती १३,९३,५२३ ११,००,५५०व्यंकटेशकृपा ३,४०,०३५ २,४०,३१०दि. माळेगाव ६,०३,८०० ६,४९,३००नीरा भीमा ३,९८,३७० ३,२२,१६०सोमेश्वर ६,४३,८१३ ७,२२,४००पराग अॅग्रो ३,४१,५८३ ३,२२,७३१श्रीनाथ ३,२८,५२५ २,१५,९८०.संत तुकाराम २,००,१९० १,९७,३५०विघ्नहर ५,१०,३४० ५,२६,४००छत्रपती ५,२६,२५१ ५,६८,५००साईप्रिया १,७०,२१० १,४८,८५०कर्मयोगी ३,०१,४०० २,६४,६५०भीमाशंकर ५,५५,३८० ५,५८,९००एकूण ७४,२९,७२० ६६,९८,६३१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.