Satara News: जलजीवन मिशनअंतर्गत आठ ते २२ मार्च या कालावधीत देशभर राष्ट्रीय जलमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचे नामांकन मागविण्यात आले होते. .या जलमहोत्सव कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतची पाणीपुरवठा व्यवस्था, १०० टक्के वापरकर्ता शुल्क वसुली आणि ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळे राज्यस्तरावरून राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नामांकित करण्यात आले होते. याबरोबरच सातारा जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्याला विशेष आमंत्रित करण्यात आले होते..Jal Jeevan Mission: ‘हर घर जल’ योजनेचा बोजवारा.या कार्यक्रमास बनवडी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष पांडुरंग राजाराम कोठावळे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी लाटे, तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यकारी अभियंता गौरव चक्के, राज्यस्तरावरून अतिरिक्त अभियान संचालक दीपाली देशपांडे-सावेळकर, विजयकुमार वाईकर व राज्य समन्वयक हसन तडवी उपस्थित होते..Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’च्या ‘त्या’ कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाका.जलजीवन मिशनअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण एक हजार ६१० योजनांपैकी ११२ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या असून, ४९८ योजना प्रगतिपथावर आहेत, .तसेच जिल्ह्यातील सहा लाख १८ हजार २७७ ग्रामीण कुटुंबांपैकी पाच लाख ७३ हजार १६८ घरांना घरगुती नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि शाश्वत बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.