Jalna News : बँकांनी मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रमांतर्गत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. आजपर्यंत केवळ ६० प्रकरणांना मंजुरी मिळाली असून लक्ष्य १५०० आहे. तरी प्रत्येक शाखेने किमान दोन प्रकरणे शोधून त्यांना मंजुरी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले. .जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्स बैठकीत विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारीश्रीमती मित्तल म्हणाल्या, की पीएम एफएमई व एआयएफ अंतर्गत जालना जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक असली तरी चालू वर्षी मंजुरी फक्त ३६ प्रकरणांची झाली आहे. .PM Viksit Bharat Employment Scheme: विकसित भारत रोजगार योजना फसवी घोषणा : गांधी.तर १३८ प्रकरणे प्रलंबित असून बँकांनी ती प्राधान्याने निकाली काढावी. पीएम विश्वकर्मा या केंद्र शासनाच्या सर्वसमावेशक योजनेची माहिती बँकांना देण्यात आली. या योजनेत १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश असून त्याचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले..CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये.शेतकऱ्यांना ३३९६ कोटींचे पीककर्ज...पीककर्ज वितरण बाबतीत आतापर्यंत ४३ टक्के इतकी (५७५ कोटी) प्रगती झाली आहे. तर वार्षिक लक्ष्य १३२० कोटी आहे. शेतकऱ्यांच्या कमी प्रमाणात नूतनीकरणामुळे ही प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही, असे निदर्शनास आले. जिल्ह्यातील ३.३१ लाख शेतकऱ्यांना एकूण ३३९६ कोटींचे पीककर्ज वितरित झाले आहे. मात्र, २.६१ लाख शेतकऱ्यांचे सुमारे २५०० कोटी (७३ टक्के) थकबाकीचे आहे..केवळ ९ टक्के खाती विमा कवचाखालीप्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील २,४०,००० पात्र शेतकरी कर्जखाते असून त्यापैकी केवळ ९ टक्के खाती विमा कवचाखाली आली आहेत. मिशन शक्ती महिला बचत गट अंतर्गत बँकांनी चांगली कामगिरी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.