Mumbai News: जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, या राज्य सरकारच्या आश्वासनाचा मोठा परिणाम पीककर्जाच्या परतफेडीवर झाला आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे आली नसली, तरीही आधीचेच कर्ज न फेडल्याने रब्बी हंगामातील कर्जवाटपावर त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी, या हंगामात केवळ ३० टक्केच कर्ज वितरण झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. .विशेष म्हणजे, यात जिल्हा सहकारी बँकांनी केवळ १४ टक्के कर्जवाटप केले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी नेहमीप्रमाणे हात आखडता घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी मागील दोन वर्षांपासून विविध शेतकरी संघटनांसह माजी आमदार बच्चू कडू यांनीही आक्रमक आंदोलने केली होती. त्यामुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली आहे..Crop Loan Distribution: पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करा: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी .या कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केलेली नाही. यंदाच्या खरीप हंगामात एकूण लक्ष्यांकाच्या ३८,३२२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यामध्ये जिल्हा बँकांनी शंभर टक्के कर्जवाटप केले होते. तर खासगी लघू वित्त बँकांनी केवळ ४५ टक्के आणि सार्वजनिक व ग्रामीण बँकांनी ६१ टक्के कर्जवाटप केले होते. रब्बी हंगामात मात्र या सर्वच बँकांनी हात आखडता घेतला असून, कर्जाची परतफेड न झाल्याचा हा परिणाम असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे..राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत २०२५ साठी संकलित करण्यात आलेल्या जिल्हानिहाय आराखड्यानुसार राज्याचा पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक ७६ हजार १११ कोटी रुपयांचा होता. त्यापैकी खरीप कर्जवाटपासाठी ५४ हजार ८६ कोटी रुपयांचा व रब्बीसाठी १९ हजार २५ कोटी रुपयांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. ६६ लाख ४० हजार शेतकऱ्यांना हा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन होते. रब्बी हंगामामध्ये १९ लाख ६ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे नियोजन होते. मात्र त्यापैकी केवळ ३ लाख ३० हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या रब्बीचा कर्जवाटपाचा लक्ष्यांक ६८३६ कोटी रुपयांचा होता. त्यापैकी ९३५ कोटी रुपयांचे म्हणजेच केवळ १४ टक्केच कर्जवाटप १ लाख ६ हजार शेतकऱ्यांना करण्यात आले आहे..Rabi Crop Loan: पीक कर्जासाठी वाढीव निधीची गरज.सार्वजनिक व ग्रामीण बँकांकडून २९ टक्के कर्जवाटपसार्वजनिक आणि ग्रामीण बँकांसाठी ११ हजार ३९४ कोटी रुपयांचा लक्ष्यांक होता. हे कर्ज ९ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना वाटप होणे अपेक्षित होते. त्यापैकी १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना ३३४१ कोटी रुपयांचे, म्हणजेच २९ टक्के कर्जवाटप केले आहे. खासगी व लघू वित्त बँकांसाठी ३४९५ कोटींचा लक्ष्यांक होता. हे कर्ज २ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना वाटप होणे अपेक्षित होते. यापैकी ६८ हजार शेतकऱ्यांना २२५६ कोटी रुपयांचे, म्हणजेच ६५ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. या बँकांनी कमी शेतकऱ्यांना जास्त कर्ज वाटप केले आहे..परदेशी समितीचा अहवाल एप्रिलमध्ये अपेक्षितप्रवीण परदेशी समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता असून त्यानंतर कर्जमाफीबाबत हालचाली सुरू होतील..रब्बी हंगाम कर्जवाटपबँक लक्ष्यांक(कोटी रुपये) कर्जवाटप(कोटी रुपये)जिल्हा बँक ६८३६ ९३५सार्वजनिक बँक ११६९४ ३३४१खासगी /लघुवित्त बँका ३४९५ २२५६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.