Pune News: केळीच्या बाजारभावात या आठवड्यात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. प्रतिकिलोला अवघा तीन ते पाच रुपये एवढा नीचांकी बाजारभाव मिळत आहे. तीन वर्षांत प्रथमच केळीचे दर कोसळल्याने उत्पादक हतबल झाला आहे. एकरी उत्पादन खर्च दोन लाख रुपये आणि प्रत्यक्षात उत्पन्न ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याने याचा कसा मेळ घालायचा, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे..मागील तीन चार वर्षांमध्ये केळीच्या बॉक्स पॅकिंग निर्यातक्षम मालाला २० ते २८ रुपये एवढा किलोला बाजारभाव मिळत होता. तर खोडव्याच्या निर्यातक्षम मालाला पंधरा ते वीस रुपये दर मिळत होता. देशांतर्गत जाणारा स्थानिक माल दहा रुपयांच्या आत विकला नव्हता मात्र या आठवड्यात दरात प्रचंड घसरण झाली..Banana Price: खानदेशात केळीच्या दरात घट.कंदर जिल्हा सोलापूर येथील केळीचे व्यापारी योगेश कदम म्हणाले, की मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणात केळीची आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी केळीची रोपे तयार करणाऱ्या ठराविक कंपनी होत्या मात्र त्यामध्ये आता मोठी वाढ झाल्याने लागवडीचे क्षेत्र वाढले आहे..Banana Price: केळी दरप्रश्न कायम.शासन केळी लागवडीला अनुदान देते. मात्र त्याच्या गुणवत्तेवर लक्ष देत नाही. फक्त लागवड वाढून चालणार नाही तर निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी खत व पाणी व्यवस्थापन त्यानंतर फ्रुटकेअर या बाबत शेतकऱ्यांना ॲग्रोनॉमिक सपोर्ट शासनाकडून मिळाला तरच केळीची गुणवत्ता वाढेल व हा माल आखाती देशाबरोबरच युरोपसह चीन, जपान, कोरिया, रशिया या देशात जाईल व येथील मालाला अधिकचा चांगला दर मिळेल.- जयकुमार शिंदे, अध्यक्ष- बना हेल्थ फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, वरकुटे बुद्रुक..सध्या केळीचा उत्पादन खर्च एकरी दीड ते पावणे दोन लाख रुपये एवढा झाला आहे. एकरी उत्पादन सरासरी वीस ते पंचवीस टन निघते. मागील महिन्यात एका प्लॉटला २७ रुपये दर मिळाला. आता दुसरा प्लॉट काढणीस आला आहे आणि दर पडलेले आहेत. सरासरी वीस रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.- अक्षय जाधव, युवा केळी उत्पादक, जाधववाडी (ता. इंदापूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.