Akola News: अमेरिका-इस्त्राईलचे इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा फटका स्थानिक बाजारात बसू लागला आहे. बाजारात केळीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झाली असून, उत्पादकांना आर्थिक फटका बसू लागला आहे. केळी खरेदीदारांच्या मते, बाजारातील वाढलेली आवक आणि निर्यात ठप्प झाल्यामळे दरघसरण झाली आहे..बाजारात सध्या सुपर दर्जाच्या केळीला प्रति क्विंटल सुमारे १२०० रुपये दर मिळत आहे. मध्यंतरी हाच दर १७०० ते १९०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल पोहोचला होता. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत दरात ५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी केळीची आवक कमी असल्याने बाजारात दर चांगले मिळत होते. मात्र नवती सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात केळी बाजारात दाखल होत आहे. परिणामी, पुरवठा वाढून दरावर दबाव निर्माण झाला आहे..Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण.आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे निर्यातीसाठी रवाना झालेले काही कंटेनर मार्गात अडकून पडले आहेत. काही माल परतीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. परिणामी, निर्यातक्षम दर्जाच्या केळीची खरेदी मंदावली आहे. निर्यातदार सध्या खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याने उत्पादकांना स्थानिक बाजारावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे निर्यातक्षम केळीचाही दर घसरून सुमारे १२०० रुपयांपर्यंत खाली आला आहे..Banana Price: केळी दरात खानदेशात घसरण.दरम्यान, उन्हाळ्याचा हंगाम सुरू होत असल्याने बाजारात कलिंगड व खरबूज यांसारख्या फळांची आवक वाढत आहे. या फळांना ग्राहकांकडून वाढती मागणी असल्याने केळीच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे खरेदीदार सांगतात. सध्या बाजारात केळीची उपलब्धता दिवसेंदिवस वाढत असल्याने दरावर आणखी दबाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यात पूर्ववत सुरू झाली आणि स्थानिक बाजारातील मागणी वाढली तरच दरात काही प्रमाणात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत..युद्धाच्या पार्श्वभूमीवर केळीच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातून मागील दोन हंगामांपासून निर्यात वाढत होती. त्यामुळे उत्पादकांना चांगला दर मिळत होता. मात्र सध्या माल पुढे जात नसल्याने निर्यात थांबली आहे. यामुळे केळी उत्पादकांचे क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती किती दिवस टिकेल याची निश्चितता नसल्याने उत्पादक चिंतातूर आहेत. - सचिन कोरडे, राष्ट्रीय समन्वयक, बनाना महासंघ, हिंगणी, जि. अकोलाc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.