Jalgaon News : खानदेशात कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड किंचित वाढेल किंवा स्थिर राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाऊस, मजूरटंचाई व नैसर्गिक समस्यांना तोंड देऊन शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत. सुमारे ११ हजार हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. .लागवड सुरू आहे. पुढे लागवडीस आणखी गती येईल. यंदा खानदेशात सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टरवर कांदेबाग बहरातील केळी बागांची लागवड होईल. ही लागवड सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होते. परंतु कंद, रोपे उपलब्धता व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवडी करीत आहेत. परंतु खानदेशातील तापमान सध्या कमी आहे..Banana Cultivation : मृग बहर केळी लागवड रखडली.उष्णतेत काटेकोर नियोजनपण उकाडा, उष्णता आहे. मध्येच पावसाचे संकेत मिळत आहेत. पुढे दीपोत्सव, सणासुदीचा काळ आहे. असे असतानाही शेतकरी ही लागवड करीत आहेत. लागवडीसाठी केळी रोपे व कंदांचाही उपयोग केला जात आहे. .Banana Cultivation : कांदेबाग केळी लागवडीची तयारी.रोपांना क्रॉप कव्हर लावण्याची गरज नाही. कारण उष्णता अधिक नाही. पाऊस, ढगाळ वातावरण आदी समस्या खानदेशात सुरूच आहेत. अशात रोहित्रांतील बिघाड, वीज बंद होणे आदी समस्याही तयार होत असून, यावर ट्रॅक्टरचलित जनित्राचा पर्यायही शेतकऱ्यांनी शोधला आहे..नंदुरबारमध्येही वाढतेय लागवडनंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा तालुक्यांतही लागवड मागील तीन वर्षे सतत वाढली असून, तेथे दोन ते तीन हजार हेक्टरवर केळी लागवड अपेक्षित आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही कांदेबाग केळी लागवड दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे. केळी लागवडीसाठी कंद मुबलक आहेत. तसेच काही कंपन्या रोपांचाही पुरवठा वेळेत करीत आहेत. रोपांचे दर स्थिर आहेत. १५ ते २१ रुपये प्रति रोप, असे केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे दर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात व अन्य जिल्ह्यांतील कंपन्याही रोपांचा पुरवठा करीत आहेत..ठळक बाबी...खानदेशात कांदेबाग बहरातील केळी लागवडीसाठी जळगावातील जामनेर, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, नंदुरबारमधील तळोदा व अक्कलकुवा हा भाग अग्रेसर आहे.अन्य भागातही कमी क्षेत्रात या कांदेबाग बहर केळीची लागवड केली जाते.यंदाची लागवडही स्थिर राहील.शेतकरी कमी लागवडीत काटेकोर व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेतअनेक भागांत पाणी आहे. परंतु वीज व्यवस्थित नसते. यामुळे देखील कमी लागवड करून त्यात शेतकरी परिश्रम घेऊन कार्यवाही करीत आहेतसर्वाधिक लागवड जामनेर, चोपडा, जळगाव भागात होईल. ही लागवड सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर अपेक्षित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.