Insurance Scam: जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या केळी विमा अर्जांच्या तपासणीतून गैरप्रकार उघडकीस आले आहेत. चोपडा, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर या तालुक्यांत लागवड नसताना विमा अर्ज भरणे, लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढणे असे प्रकार झाल्याचे आढळून आले आहे.