Jalgaon News: खानदेशात जानेवारी २०२६ मध्ये विविध भागांत वादळी पाऊस झाला. याचा फटका पिकांसह पशुधनासही बसला. सर्वाधिक फटका केळीला बसला आहे. परंतु आपले विमाप्रस्ताव मंजूर नसल्याने केळी पीकविमाधारक या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याची स्थिती आहे..हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत ऑक्टोबर २०२५ मध्ये केळी उत्पादक सहभागी झाले. २०२५-२६ या हंगामात नोव्हेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत केळी पिकास या योजनेतून विमा संरक्षण आहे..Banana Farmer Issue: केळी उत्पादक तोट्यात.योजनेत सहभागानंतर महिनाभरात किंवा यापेक्षा कमी कालावधीत सहभागी पात्र विमाधारकांचे विमा प्रस्ताव मंजूर व्हायला हवे होते. परंतु या योजनेतील सहभाग या हंगामात अधिकचा असल्याचा संशय व्यक्त करून विमा कंपनी व कृषी विभागाने केळी पिकाची पडताळणी एमआरसॅकद्वारे केली..Banana Farmers: आंध्र प्रदेशात केळीचा भाव कोसळला; जगनमोहन रेड्डींचा सरकारवर हल्लाबोल.यात सुमारे ४४ हजार हेक्टर एवढ्या विमा संरक्षित क्षेत्रात केळी पीक नसल्याचे दिसून आल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. यात ज्यांच्या शेतात केळी आहे, त्यांचे विमा प्रस्ताव मंजूर करणे अपेक्षित आहे. पण हे प्रस्ताव अजूनही मंजूर नाहीत..ज्यांनी केळीची लागवड नसताना सहभाग घेतला, त्यांच्याबाबत शासन, विमा कंपनीने आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, जे प्रामाणिक केळी उत्पादक विमाधारक आहेत, त्यांचे विमा प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी, अशी मागणी विमाधारकांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.