Akola News : जिल्ह्यातील तसेच तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर दरांबाबत होणारा अन्याय थांबविण्यासाठी व्यापारी, शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त बैठक घेऊन केळीचा दर ठरविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे उत्पादकांच्या वतीने करण्यात आली आहे..या संदर्भात केळी उत्पादक संघाचे कार्याध्यक्ष सुभाष रौंदळे (दानापूर, ता. तेल्हारा), राज्य सरचिटणीस सचिन कोरडे (हिंगणी बुद्रूक, ता. तेल्हारा), शेतकरी राजेश वानखडे (हिवरखेड) व जिल्हाध्यक्ष अनिल इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी शिष्टमंडळाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली..Tissue Culture Banana : उतिसंवर्धनाद्वारे मिळवा रोगमुक्त केळी रोपे.निवेदनात संघाने म्हटले आहे, की तेल्हारा तालुका केळी उत्पादनात आघाडीवर असून शासन शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी प्रोत्साहन देते. मात्र, केळीच्या भावाबाबत कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. .सध्या सोलापूर जिल्ह्यात केळीला २२०० ते २६०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे; परंतु अकोला जिल्ह्यात केवळ ६५० रुपये भाव मिळत असून व्यापारी त्याहीपेक्षा कमी म्हणजे ४०० ते ५०० रुपयांमध्ये खरेदी करत आहेत. .Banana Farming: खानदेशात केळी लागवड रखडत.यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहत आहे, नासाडी होत आहे आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे..केळी पिकाला हमीभाव धोरण लागू करावे, केळी पिकाचा समावेश भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत करण्यात यावा, तसेच प्रलंबित असलेल्या केळी पीकविमा प्रकरणांवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.