Banana Price Fall issue: ‘‘आता दर तुम्हीच ठरवा, पण केळी घेऊन जा...’’ अशी आर्त विनवणी करण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. .इराण आणि इस्राईल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांत होणारी निर्यात पूर्णपणे कोलमडली असून, गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील केळी बागांमध्येच सडू लागली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..Banana Crop Damage: वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान.बाजारपेठेतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील केळीला आखाती देशांत मोठी मागणी असते..Banana Price: केळीचे दर पोहोचले नीचांकी पातळीवर.मात्र युद्धामुळे गेल्या सात आठवड्यांपासून निर्यात ठप्प आहे. यामुळे दरात प्रचंड घसरण झाली आहे. केळीचे दर कोसळून आता प्रति किलो ३ ते ४ रुपयांवर आले आहेत..युद्धामुळे व्यापारी फिरकेनासे झाले आहेत. उभ्या बागा डोळ्यादेखत नासू लागल्या आहेत. शासनाने आता तरी लक्ष देऊन आम्हाला मदत करावी.विजय लबडे, केळी उत्पादक, शेटफळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.