Agriculture Crisis: मागील चार दिवसांत झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळीची सर्वाधिक हानी जळगाव, धरणगाव व रावेर भागांत झाली आहे. या अस्मानी कहरामुळे सुमारे नऊ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून, त्यापैकी केळीचे क्षेत्र सुमारे पाच ते सहा हजार हेक्टर एवढे आहे. केळीला एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च लागतो. .अद्यापही वादळी पाऊस व गारपिटीचे सावट कायम आहे. २७ जानेवारी २०२६ रोजीदेखील चोपडा, जळगाव भागांत वादळी पाऊस, गारपीट झाली होती. त्यात सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती..Banana Crop Damage: वादळ, गारपिटीचा केळी पिकास दर वर्षी मोठा तडाखा.कमी दरांचा फटकाएकीकडे रावेर, जळगाव भागांत काढणीवरील केळी बागांची हानी झाली असताना दुसरीकडे केळीचे दरही कमी झाले आहेत. युद्धाचे कारण पुढे करून मागील पंधरवड्यापासून केळीची ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जात आहे. केळी नाशिवंत असल्याने तिची वेळीस विक्री करावी लागते. वादळी पावसाचे संकट भेडसावत असल्याने शेतकरी मिळेल त्या दरात केळीची विक्री करीत आहेत. त्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे..Banana Crop Damage: केळीच्या नुकसानीचे परतावे अप्राप्त.खरेदीदारांकडून लूटकेळीची कमी दरात खरेदी व नैसर्गिक आपत्तीमुळे हानी असे दुहेरी संकट शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यातच मागील तीन ते चार वर्षांपासून जानेवारी ते जून या महिन्यांत दरवर्षी केळीला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आहे. खरेदीदारांकडूनही लूट सुरू असते. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, अशी कैफियत उत्पादकांनी व्यक्त केली..पंचनाम्यांची अट चुकीचीकेळीची पाने फाटल्याने बुंध्यास उष्णतेचा दणका बसणार आहे. पण प्रशासन मात्र केवळ केळीची पाने फाटलेली असल्यास पंचनामे टाळत आहे. नुकसान पातळी ३३ टक्क्यांवर दिसत असल्यास पंचनामे करू, असे कृषी सहायक सांगत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.