Heavy Rain Damage: अकोट तालुक्यातील पणज मंडल परिसरात बुधवारी ( ता.१७) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे..पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जहागीर व धामणगाव परिसरातील अनेक केळी बागा वादळामुळे उन्मळून पडल्या आहेत. अनेक झाडे मधोमध तुटल्याने कापणीयोग्य केळीचे घड जमिनीवर कोसळले असून पीक पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे..Banana Crop Damage: पंधरा मिनिटांतच केळीबागा भुईसपाट.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन केळीची लागवड केली होती. मात्र एका रात्रीत संपूर्ण मेहनत वाया गेल्याने कर्जफेडीचा प्रश्न गंभीर बनला आहे..Banana Crop Damage: वादळी वाऱ्याने केळी बाग उद्ध्वस्त.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी भेट दिली. यावेळी अकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोख राहाणे, गजानन डाफे, विकास देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. त्यांनी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून तातडीने पाहणी व पंचनामे करण्याची मागणी केली..दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. येत्या दोन दिवसांत पंचनामे न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाचडे यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.