Crop Protection Challenges: अकोला जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यापासून तीव्र उष्णतेची लाट कायम असून, वाढत्या तापमानाचा केळी पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक दिवस सलग ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या उत्पादकांना तातडीने पीकविम्याची संरक्षित रक्कम मंजूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. .या संदर्भात केळी उत्पादक संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे यांनी सोमवारी (ता. ११) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली..Banana Crop Damage: खानदेशात वादळी पाऊस, उष्णतेचा केळीला फटका.कोरडे यांनी सांगितले की, हिवरखेड (ता. तेल्हारा) महसूल मंडलात सलग नऊ दिवस ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान आधारित पीकविमा योजनेनुसार हा ‘ट्रिगर’ लागू होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने विमा कंपनीने तातडीने जाहीर करावे असे म्हटले..Rain Crop Damage: पावसामुळे पूर्व विदर्भातील ६३०३ शेतकऱ्यांना फटका.उच्च तापमानामुळे केळी बागांना मोठा फटका बसला आहे. अनेक बागांतील झाडांची पाने वाळून गेली असून, फळांच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम दिसून येत आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या केळीच्या रोपांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी उष्णतेच्या तडाख्यामुळे रोपे पूर्णपणे वाळून गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..सलग उष्णतामानात वाढएप्रिल महिन्याच्या १४ तारखेपासून जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १४ ते ३० एप्रिल या कालावधीत तब्बल १५ दिवस तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर राहिल्याची नोंद झाली आहे. या उष्णतेमुळे केळी पिकावर ताण निर्माण झाला असून, उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..हवामान बदलामुळे वाढणाऱ्या अशा संकटांचा सामना करण्यासाठी पीकविमा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन हिवरखेड मंडळातील नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना विम्याची संरक्षित रक्कम मंजूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.