Mumbai News : वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि देशांतर्गत खाद्यतेलाची मागणी पूर्ण करून अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी बांबू लागवडी सोबत पाम लागवडीच्या पर्यायाची व्यवहार्यता तपासून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी इंडोनेशियाच्या वरिष्ठ शिष्टमंडळाला दिली..इंडोनेशियन पाम ऑइल असोसिएशन (IPOA), गबुंगन पेंगुसाहा केलापा सावित इंडोनेशिया (GAPKI) तर्फे शुक्रवारी (ता. २६) मुंबईतील ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आयोजित उच्चस्तरीय बैठकीला पटेल यांनी संबोधित केले. .Palm Tree: ताड वृक्ष: निसर्गाचा बहुपयोगी खजिना!.यावेळी आयपीओएचे अध्यक्ष एडी मार्टोनो, परराष्ट्र व्यवहार प्रमुख डॉ. फादिल हसन, वरिष्ठ मंत्री जुन कुनकोरो, इंडोनेशियाच्या परराष्ट्र विभागातील अधिकारी नी मेड महात्मा देवी, सेरुनी रिया सियानिपार, शेती व पूरक उद्योगांचे गुंतवणूक सल्लागार दीपक परीक आदी मान्यवर उपस्थित होते.या उच्चस्तरीय बैठकीमध्ये भारत-इंडोनेशिया पाम तेल व्यापारातील सहकार्य मजबूत करणे, स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे, पारदर्शकता आणि शाश्वतता तसेच भारताच्या खाद्यतेल धोरणाला पाठिंबा देणे, इंडोनेशियाच्या सहकार्याने भारतात पाम लागवडीचे प्रयोग या मुद्यांवर चर्चा झाली..यावेळी पटेल म्हणाले, ‘‘फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये हवामान बदलाचे संकट दिसून येत आहे. आयपीसीसीने यासंदर्भात दिलेला इशारा गंभीर आहे. २०५० पर्यंत ४५० पीपीएम कार्बन उत्सर्जन पोहोचले तर मानव जातीचे जगणे मुश्कील होईल. वाढते कार्बन उत्सर्जन, तापमान वाढ रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. इंडोनेशियाचे पाम तेलापासून बायोडिझेल बनवण्याचे तंत्रज्ञान भारतासाठी गरजेचे आहे. .Climate Change Impact: समायोजन हवामान बदलाशी!.बांबू आणि पाम यांची मिश्र शेती केल्यास वातावरण बदलाच्या संकटाला तोंड देणे आणि खाद्यतेलातील आत्मनिर्भरता ही उद्दिष्टे गाठायला मदत होईल. बांबूपासून इथेनॉल बनवण्याची रिफायनरी आसाममधील नुमालीगडमध्ये ( आसाम) सुरू झाली असून बायोमासचा वापर करून सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प टप्प्याटप्प्याने कोळशाचा वापर कमी करतील. .भविष्यात ऊर्जेची लढाई जैवइंधन विरोधात जीवाश्म इंधन अशी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर बांबू आणि पामची मिश्र शेती या शाश्वत धोरणाला निश्चितपणे बळकटी देईल.'' एडी मार्टोनो म्हणाले,' इंडोनेशियाने सध्या ऑइल पाम बियाणे निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर उत्पादन होत असून २२ कंपन्यांमार्फत बियाणे निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. .भारताला तंत्रज्ञान देताना आम्ही भारताला स्पर्धक नव्हे तर धोरणात्मक भागीदार समजतो. पाम तेलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, हा गैरसमज दूर करण्यासाठी ग्राहक जागृती महत्त्वाची आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढीसाठी मोठ्या संधी आहेत.''.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.