Mumbai News: ‘‘चीनमध्ये बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या बांबूवर मोठा उद्योग उभा राहिला आहे. आपल्याकडे कृषी क्षेत्राशी संबंधित एकतर्फी काम केले जाते. बांबू लागवड करून एखादी चटई किंवा फ्लॉवर पॉट दाखविला जातो. त्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत नाही. याउलट बांबू आधारित मूल्य साखळी उभाण्याबरोबरच बांधकाम, ऊर्जा आणि फर्निचरसाठी बांबू लागवडीवर भर दिल्यास मोठा उद्योग उभा राहील,’’ असे मत मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले. .यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन’ व फिनिक्स फाउंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांच्या बांबू परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. या वेळी फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले व कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले..Bamboo Project India : बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प.‘बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ’ अशी संकल्पना घेऊन परिषदेची सुरुवात झाली. श्री. परदेशी म्हणाले, ‘‘केवळ दिखाऊ वस्तू तयार करून बांबू लागवडीतून शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होणार नाही. आपल्याला बांबूवर आधारित मूल्यसाखळी तयार करण्याची गरज आहे..त्यातून शेतकऱ्यांसाठी क्रांती घडवून आणू शकतो. बांबू आधारित उद्योगाच्या विकासासाठी आशिया विकास बँकेकडून चार हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीचा उपयोग बांबू लागवडीसह संशोधन आणि बांबू आधारित उद्योग उभारणीसाठी अधिक असणार आहे.’’.bamboo Plantation : रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार.श्री. पटेल म्हणाले, की नैसर्गिक संकटाने पृथ्वी व्यापली गेली आहे. वातावरण बदलाच्या लढाईसाठी बांबू एकमेव पर्याय आहे. जीवाश्म इंधनविरोधात जैवइंधन अशा लढाईत शाश्वत मार्गाने वाटचाल करावी लागणार आहे. श्री. गोगावले म्हणाले, की बांबू लागवड आणि उद्योगाच्या माध्यमातून दीड हजारांपेक्षा जास्त वस्तू बनल्या जातात. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत. ..श्री. जयस्वाल म्हणाले, की शेती सध्या नैसर्गिक संकटांशी झुंजत आहे. बाबू मॅन पाशा पटेल यांनी मिशनच्या माध्यमातून बांबू लागवड आणि उद्योग उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. गोदरेजचे समूहाचे अध्यक्ष राकेश स्वामी, केसर पेट्रोलियम उद्योगाचे प्रमुख दिनेश शर्मा, आशिया विकास बँकेचे संचालक ताकेशी उईडा हेदेखील या वेळी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.