Raigad News: राज्य शासनाच्या वतीने बांबू लागवड वाढवून रोजगारनिर्मिती व आर्थिक लाभ साध्य करण्यासाठी विशेष नियोजन जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबत मार्गदर्शन शिबिर घेत शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, शासनाची ही योजना कागदावरच राहिल्याने बांबू कारागिरांचा प्रश्न ऐरणीवर आल्याची माहिती कारागिरांच्या वतीने देण्यात आली आहे. .एकेकाळी ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू हमखास आढळायच्या. पण, कालांतराने स्वस्त, हलक्या, आकर्षक आणि सहज उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल प्लॅस्टिककडे झुकला आणि बांबू वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात घटली..Bamboo Business Opportunity : बांबू पिकामध्ये व्यावसायिक संधी.अशात शासनाने बांबू लागवडीवर भर देण्याबरोबरच बांबूच्या तयार वस्तूंना बाजारपेठ, योग्य दर, शासकीय खरेदी व प्रचार-प्रसाराची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मत बांबू कारागिरांकडून व्यक्त होत आहे. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे धोके लक्षात घेता बांबू वस्तूंचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे..बांबूपासून वस्तू तयार करणे ही अत्यंत कष्टाची आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया आहे. जंगल किंवा मळ्यातून बांबू कापूण ते वाळवत, त्यावर प्रक्रिया करणे. ही सर्व प्रक्रिया घडल्यानंतर त्या बांबूपासून चाळण्या, टोपल्या, सुप, झाडू, चटई, धान्य साठवणुकीच्या पेट्या इत्यादी वस्तू साकारल्या जातात..Bamboo Farming: बांबू : इथेनॉलसाठी एक चांगला पर्याय .बांबूच्या वस्तू बनवताना खूप मेहनत असून वेळही जास्त लागतो. इतक करूनही बाजारात म्हणावे तसे दर मिळत नाहीत. परिणामी अनेकांनी हा पारंपरिक व्यवसाय सोडून शेतीमजुरी किंवा छोटे-मोठे व्यवसाय स्वीकारले आहेत. त्यामुळे कुशल कारागिरांची कमतरता देखील भासत आहे..मेहनत जास्त, मोबादला कमीआधुनिकतेच्या नावाखाली बांबूच्या वस्तू केवळ शोभेच्या वस्तू म्हणून वापरल्या जाऊ लागल्याने मूळ उपयोगिता बाजूला पडत चालली आहे, असे मत स्थानिक बांबू कारागीर तरुण पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पूर्वी आमच्या वस्तूंना मोठी मागणी होती. आता प्लॅस्टिकमुळे आमचा व्यवसाय जवळजवळ बंद पडला आहे. मेहनत जास्त आणि मोबदला कमी असल्याने अनेकांनी हा व्यवसायदेखील सोडला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.