Sheep Conservation : बाळूमामाच्या नावानं चांगभलं

Diwali Article 2024 : बाळूमामा मंदिर ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, शुद्ध वंशाच्या चाळीस हजार दख्खनी मेंढ्यांचा सांभाळ करतं आहे. आणि असं म्हणतात, की या मेंढ्या थेट बाळूमामांच्या वेळेपासून आहेत. एकूण १७ असे कळप आहेत. ते महाराष्ट्रभर फिरत असतात.
Sheeps
SheepsAgrowon
Published on
Updated on

Balumama Temple Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे अनेक लोकांचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण. गुढीपाडव्याला, अमावास्येला तिथं मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटकातून अनेक भाविक बाळूमामाच्या दर्शनाला येतात आपापलं गाऱ्हाणं, नवस घेऊन. लोकांची अशी श्रद्धा आहे की त्यांचं काम होतं. मला काही वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला यात्रेला जाण्याचा योग आला आणि मला बाळूमामा पावला तो वेगळ्या अर्थाने. बाळूमामा मंदिर ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, शुद्ध वंशाच्या चाळीस हजार दख्खनी मेंढ्यांचा सांभाळ करतं आहे.

आणि असं म्हणतात, की या मेंढ्या थेट बाळूमामांच्या वेळेपासून आहेत. एकूण १७ असे कळप आहेत. ते महाराष्ट्रभर फिरत असतात. श्रद्धेपोटी लोक बोलावतात. शेतात बसवतात. गावात दोन-तीन दिवस उत्सव असतो. बाळूमामाची मेंढरं शेतात बसवले की चौपट पीक येतं असं लोक म्हणतात. यातली श्रद्धा-अंधश्रद्धा हा भाग जरा वेळ बाजूला ठेवू; परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी जात किंवा एखादा पशुवंश टिकवून ठेवणे हे कदाचित भारतातील एकमेव उदाहरण असेल. आणि ते देखील पूर्णपणे लोकसहभागातून. या मेंढ्यांतील एडके (मेंढे) आणि इतर मेंढ्या धनगरांच्या नियमानुसार विकले जातात. बाकी सर्व व्यवहार हे इतर धनगर करतात तसेच असतात. परंतु एक पायंडा असा की बाळूमामांपासून चालत आलेली परंपरा आहे तेव्हाचा वंश टिकवला पाहिजे.

Sheeps
Goat Farming : शेळ्यांच्या निरोगी वाढीसाठी प्रयत्न

भारतात परंपरागत पशुधन टिकवण्याच्या, पशूंच्या जाती टिकवण्याच्या अनेकविध प्रथा आहेत. त्या गावोगावच्या जत्रा आणि मेळे यांच्या माध्यमातून श्रद्धेपोटी अनेक वर्षांपासून टिकल्या आहेत. जसे बंजारा समाजातील सेवालाल महाराजांनी कुठल्या बंजारांनी कुठल्या रंगाची जनावरे ठेवायची हे सांगून ठेवले आहे असा समज आहे. आणि त्यातून ही विविधता टिकली आहे. कर्नाटकात अमृतमहल कावल हा असाच प्रकार. हजार दोन हजार एकर वरील जमीन ही अमृतमहल जनावरांसाठी राखून ठेवायची. त्या कळपातून शेण, दूध, खोंड काहीही घ्यायचे नाही आणि हा कळप असाच राखून ठेवायचा. मराठवाड्यात देखील कंधार तालुक्यात ब्रह्मदेवाचे असेच मंदिर आहे. त्याला वाहिलेली जनावरं देखील अशीच देवाची. देवाला वळू सोडणे, बोकड सोडणे किंवा देवाच्या नावाने एखादा कळप सांभाळणे ही आपल्या पूर्वजांनी जनुकं टिकवण्यासाठी करून ठेवलेली सोय आहे.

Sheeps
Goat Health Management : शेळी, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

निलगिरी पर्वतावरचे टोडा लोक असतील किंवा ओडिशामधले डोंगरिया कोंड असतील त्यांनी म्हशीला किंवा डुकराला देवपण का दिलं असेल? किंवा बाळुमामा, बिरोबा, मयाक्का ही ठिकाणं मेंढरं आणि धनगरांसाठी का महत्त्वाची असतील? कालांतराने याचं झालेलं बाजारीकरण किंवा या मागचा मुख्य हेतू लक्षात न घेता फक्त परंपरा पाळण्याला आलेलं महत्त्व हा वेगळा विषय आहे. पण त्याकडे आपण जागरूकतेनं पाहिलं नाही तर एका मोठ्या संसाधनाच्या उपलब्धतेला आपण मुकणार आहोत. जसे स्थानिक बियाण्यांच्या बाबतीत आज पन्नास टक्के अधिकार हे बड्या बहुराष्ट्र कंपन्यांच्या हातात गेले तसे पशुधनाच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही.

त्याची सुरुवात ही ‘सेक्स सीमेन’ या नव्या होऊ घातलेल्या खुळापासून सुरू होते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान, ज्याचे अधिकार आमच्या हातात नाहीत, त्याचा किती उदो उदो करायचा? मुळात ज्या जाती आणि जे समुदाय हजारो वर्षे इथे टिकले आणि रुजले त्यांना काळाच्या गरजेनुसार तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे म्हणजे स्वतंत्र असणे आणि होणे. आज जगभरात मेरिनो या एकमेव मेंढीच्या लोकरीचा प्रसार होताना दिसतो. त्याचा परिणाम आपल्या इथल्या मेंढपाळांच्या उदरनिर्वाहावर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तुरळक ठिकाणं सोडली तर बाकी ठिकाणी दोन रुपये किलोदेखील लोकर कोणी घेत नाही, फेकून द्यावी लागते. लोकर कातरायचा देखील खर्च बऱ्याच वेळा निघत नाही, असं अनेक धनगरांकडून ऐकायला मिळतं.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com