Farmer Support: मुख्यमंत्री बळिराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भूम येथील तहसील कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तिन्ही तालुक्यांतील शेतरस्त्याच्या समस्या सोडवून कामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला..बैठकीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तसेच भूम, परंडा आणि वाशी येथील तहसीलदार उपस्थित होते. यावेळी आवश्यक असलेल्या शेतरस्त्यांची तात्काळ मोजणी व सीमांकन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व प्रस्तावित रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले..Farm Road Scheme: शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्ता, हद्दी, सीमा आराखडा निश्चित करा : महाडीक.परंडा मतदारसंघातील भूम, परंडा व वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये शेतरस्त्याच्या मोठ्या प्रमाणावर अडचणी असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून त्या समस्या मार्गी लागून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला..Rail Project Development: दौंड-वाडी लोहमार्गाचे चौपदरीकरण.अधीक्षक भूमी अभिलेख विभागामार्फत सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. बैठकीस तहसीलदार जयवंत पाटील, तहसीलदार प्रकाश मेहत्रे, कृषी अधिकारी अतुल ढवळे, .जिल्हा परिषद अभियंता दिलीप पाईकराव, सर्व नायब तहसीलदार, तिन्ही तालुक्यांतील भूमी अभिलेख अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आमदार तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.