Niphad News: शेतकऱ्यांना पिकाची पेरणी, आंतरमशागत, कापणी यांसह शेतीमाल वाहतूक करण्यासाठी शेतापर्यंत खड्डेमुक्त रस्त्यांची गरज आहे. अनेक ठिकाणी शेत पाणंद रस्ते अतिक्रमणामुळे व दर्जाअभावी खराब स्थितीत आहेत, ही समस्या लक्षात घेऊन शासनाने महसूल विभागामार्फत ‘‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’’ सुरु केली आहे. ही योजना वरदान ठरणार आहे. योजना निफाड तालुक्यात प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांनी दिल्या..पाणंद रस्ते योजनेच्या निफाड विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक पिंपळगाव बसवंत येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते..Farm Roads: धाराशिव जिल्हा नियोजन समितीकडून ३२१ रस्त्यांसाठी निधी.आमदार बनकर म्हणाले, की ग्रामसेवक व तलाठ्यांमार्फत तयार केलेल्या गावनिहाय रस्त्यांच्या यादीची पाहणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करावा. पाहणी अहवालानुसार २५ किमी लांबीचे क्लस्टर तयार करावे.त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पायाभूत सुविधा देण्याचा संकल्प केल्याचे श्री. बनकर यांनी सांगितले..Farm Roads: कोल्हापुरातील १७७ गावांतील शिवार रस्त्यांचे भाग्य उजळणार.उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरूळे म्हणाले, की रस्त्याच्या पाहणीसाठी कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक केली जाईल. पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी रस्त्यातील अतिक्रमण काढून घेण्यास शेतकऱ्यांनी सहकार्य करावे..स्व. अशोक बनकर पतसंस्थेत झालेल्या बैठकीस पिंपळगाव बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे, गटविकास अधिकारी नम्नता जगताप, भूमिअभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भाबड, बांधकाम विभागाचे संकेत चौधरी, रवींद्र पुरी, पोलिस निरीक्षक गणेश गुरव, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.