Fruit Processing: बहाडोली गावातील जांभूळ व्यवसायाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून बहाडोली गावासाठी वन विभागामार्फत ‘बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे..बहाडोली गावामध्ये सुमारे ६० ते ७० टक्के शेतकरी जांभूळ उत्पादक असून, गावाच्या अर्थकारणामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जांभूळ हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी हंगामाच्या शेवटी बाजारभाव घसरल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच नैसर्गिक आपत्ती, मागणी व पुरवठ्यातील असमतोल यामुळे देखील शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जांभूळ फळाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बहाडोली ग्रामपंचायत कार्यालयामधील ग्रामसभेमधील ग्रामस्थांना वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांनी बहाडोली जांभूळ फळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले..Banana Cold Storage: जळगाव जिल्ह्यात केळीसाठी कोल्ड स्टोअरेज उभारणार : सतीश गर्जे .उद्योगाचे व्यवस्थापन प्रारंभीच्या पाच वर्षांसाठी अनुभवी व पात्र संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. उद्योग स्थिर झाल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती सक्षम झाल्यास उद्योग व्यवस्थापन हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. दरवर्षी ग्रामसभेमध्ये उद्योगाच्या कामकाजाचा लेखी अहवाल सादर केला जाणार आहे..Coconut Processing Center: मुक्त विद्यापीठात नारळावरील ‘यश कल्पतरू’ प्रक्रिया केंद्र सुरू.शेतकऱ्यांकडून जांभळाची थेट खरेदीप्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकडून जांभळाची थेट खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार आहे. उद्योग उभारणीच्या तसेच संचालनाच्या कालावधीत स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे..कुशल मनुष्यबळाची नियुक्ती होणारउद्योगामध्ये जांभूळ प्रक्रिया, ग्रेडिंग, उत्पादन निर्मिती, पॅकिंग व साठवणूक यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार असून, सुमारे सहा हजार ते आठ हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञ, तंत्रज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांचे मानधन कंपनीमार्फत अदा केले जाणार आहे..बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राज्यातील एक आदर्श ग्रामीण मूल्यवर्धन उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे.- सुशील नांदवटे, वन परिक्षेत्र अधिकारी, पालघर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.