Jalna News : पूर्णा नदीवर विदर्भात असलेला खडकपूर्णा प्रकल्पातील बॅकवॉटरमुळे तालुक्यातील २० ते २५ गावे सुजलाम् सुफलाम् बनली आहेत. पूर्णा नदीवर विदर्भातील देऊळगाव मही परिसरात संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प आहे. .या प्रकल्पाचा संचलित साठा ९३.४० दशलक्ष घनमीटर असून पूर्ण संचय पातळी ५२० पॉइंट ५० मीटर आहे. प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने भरलेला असून, मागील काळात धरणातील संपूर्ण १९ वक्र दरवाजांद्वारे पाणी सोडण्यात आले होते. .Satpuda Rainfall : यावल तालुक्यातील हरिपुरा, वड्री प्रकल्प तुडुंब.दरम्यान, या धरणाचे बॅकवॉटर जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी, ब्रह्मपुरी, आळंद, हिवरा काबली, बोरखेडी गायके, खामखेडा, नळवहिरा, निमखेडा, हनुमंतखेडा, देऊळझरी, जाफराबाद, सावंगी या गावांतील शिवारामध्ये असते. याशिवाय लगतच्या अन्य गावांतही शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध केलेले आहेत. .Rainfall News : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस.वर्षभर बॅकवॉटर राहत असल्याने या भागांत उसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जवळपास सहाशे हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आलेली आहे. दरवर्षी ऊसलागवडीचे क्षेत्र वाढत आहे. याशिवाय परिसरातील गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही धरणातील बॅकवॉटरमुळे कायमस्वरूपी निकाली निघत आहे. .नदीकाठी अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनेची कामे मागील काळात कार्यान्वित करण्यात आली आहेत. जाफराबाद शहरासह टेंभुर्णीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेली आहे..फळबाग लागवडीकडे वाढला कलवर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी उसासह फळबाग लागवडीकडे आपला कल वाढविला आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अनेकांनी केशर आंबा, सीताफळ यांसह अन्य फळपिकांना पसंती देत बागा तयार केल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.