Akola News : खारपाण पट्ट्यात वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरवली आहे. हरभऱ्याची लागवड न करता खरिपातील कपाशीचे पीक उभे ठेवून त्यातूनच फरदडच्या माध्यमातून मिळेल तेवढे उत्पादन काढण्याकडे शेतकऱ्यांचा दिसून येत आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांतील विविध भागांत वन्य प्राण्यांचा त्रास भेडसावत आहे..खारपाण पट्टा हा हरभरा उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, वन्य प्राण्यांची धुडगूस वाढल्याने हरभऱ्यासारखे पीक घेणे धोक्याचे ठरत आहे. रानडुक्कर, माकड, रोही, नीलगाय यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्षे नुकसान होत आहे. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होत असून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत आहे..Rabi Season: खरिपानंतर शेतकऱ्यांची आता रब्बीवर भिस्त.खारपाण पट्ट्यापुरताच हा त्रास मर्यादित राहिलेला नसून जिल्ह्यातील इतर भागांमध्येही वन्य प्राण्यांचा त्रास गंभीर बनला आहे. रात्री-अपरात्री शेतात येणाऱ्या प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होत असून शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून पहारा द्यावा लागत आहे. यामुळे शारीरिक व मानसिक त्रास वाढला असून अनेक शेतकरी हतबल झाले आहेत..Rabi Season: मोहोळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात.झटका देणारी यंत्रणा वापरण्याकडे कलपिकांचे संरक्षण करण्यासाठी आता शेतकरी झटका देणाऱ्या विद्युत कुंपण यंत्रणेकडे वळताना दिसत आहेत. गावोगावी या कुंपणाचा वापर वाढत असून हेक्टरी सुमारे १० ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. या यंत्रणेमुळे माकड व रानडुकरांपासून काहीप्रमाणात दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, रोही व इतर प्राण्यांपासून होणारा त्रास या कुंपणामुळेही थांबतनसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे..आमच्या गावात ४०-४० एकर हरभरा घेणारे शेतकरी होते. मीही २० एकरात हरभरा घेत होतो. मात्र, मागील काही वर्षांत या रब्बी पिकांना माकड, रानडुकरे, रोही, हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. माकड व रानडुकरांनी शेतकऱ्यांना त्रासून सोडले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा लागवड थांबवली आहे.- आशिष डोईफोडे, वरूड जऊळका, ता. अकोट, जि. अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.