Pune News: शेतकरी आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नसून स्वतः सरकार अडचणीत आले आहे. सरकारने कर्जमाफी न केल्यास एक जुलैला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला..शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरीप्रश्नी नागपूर येथे हजारो शेतकऱ्यांची एकजूट केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ‘शेतकरी एकता झिंदाबाद’ चिंतन बैठक पुण्यातील गांजवे चौकातील पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे गुरुवारी (ता. ६) घेण्यात झाली. त्यावेळी श्री. कडू बोलत होते..Farmers Issue : शेतकऱ्यांचा आवाज एकसंध राहिला तरच त्याला न्याय मिळेल.या वेळी ‘रासप’चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, फिनिक्स ॲकॅडमीचे संचालक नीतेश कराळे, शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते..श्री. कडू म्हणाले, की दिव्यांगासाठी अनेक शासन निर्णय काढले आहेत. त्यापद्धतीने पुढील काळात थकित कर्जमाफी करून नव्याने कर्ज देण्याचा काढण्याचा आदेश सरकारला द्यावा लागेल. जोपर्यंत शेतकरी थकबाकीदार होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांची ३१ मार्च, तर काहीची ३० जूनपर्यंत शेतकरी थकबाकीदार होतो. त्यामुळे या कर्जमाफीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळाला नसता..Farmer Lon Waiver Protest : कर्जमुक्ती, उर्वरित पीकविम्यासाठी राज्यभर आंदोलन ः तुपकर.मात्र, यंदा पाऊस झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ते सर्व शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहिले असते. ते सर्व शेतकरी शेतकरी थकबाकीदार झाल्याशिवाय त्यांचे कर्जमाफी होणार नाही याचा विचार केला आहे. या आंदोलनाच्यावेळी अनेक शेतकरी संघटना पुढे आल्या होत्या. त्यामुळे या संघटनांची पुढील काळात बदनामी केली जाणार असून सर्वांनी सावध व्हावे. कारण पुढील काळात दूध दर, हमीभाव, कांदा, सोयाबीन, कापूस दराचा प्रश्न पुढे येणार आहे. त्यासाठी आंदोलन करावे लागणार आहे..श्री. तुपकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मागण्या एकाचवेळी पूर्ण होणार नसून टप्याटप्याने मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागणार आहे. सोयाबीन, कापूस दराचा प्रश्न आहे. त्यासाठी पुन्हा मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. गौरव मालक यांनी प्रास्ताविक केले. तर तौफिक शेख यांनी आभार मानले..सरकार हे जनतेच्या रेट्यापुढे घाबरते. म्हणून आंदोलनकर्त्यांना कोर्टाच्या नोटिसा देतात. जसे श्री. जरांगे यांच्या आंदोलनावेळी झाले तसे या वेळी झाले आहे. सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. तसेच ३० जूनपर्यंत कर्जमाफी केली नाही, तर पुन्हा शेतकरी आंदोलन पेटेल.- महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष, रासप.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.