Poor Quality Seeds Issue: ‘‘निकृष्ट बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत. अन्यथा, अशा कंपन्यांची कार्यालये जाळून टाकू,’’ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. .शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर नोटिसा बजावणे किंवा दंडात्मक कारवाई करून न थांबता, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी. नव्या बियाणे अधिनियमात प्रति एकर किमान दोन लाख रुपये नुकसानभरपाईची सक्तीची तरतूद करावी, अशीही मागणी त्यांनी केली..Fake Soybean Seed: सोयाबीन बोगस बियाण्यांविरोधात ११४५ वर शेतकऱ्यांच्या तक्रारी.राज्यात निकृष्ट बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांविरुद्ध राज्यातील तीन जिल्ह्यांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कारवाई स्वागतार्ह असली, तरी दोषी कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द होईपर्यंत शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदार कडू यांनी केली..जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांनी शासनाकडे सादर केलेल्या अहवालात बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. बीज कायदा, १९६६ तसेच भारतीय बीज प्रमाणीकरणाच्या किमान मानकांचे उल्लंघन, एकाच बीजोत्पादन क्षेत्रासाठी वेगवेगळे लॉट क्रमांक वापरणे, बॅग व टॅग क्रमांकांतील तफावत, दिशाभूल करणाऱ्या हमी देणे, अप्रमाणित नमुन्यांची विक्री करणे, तसेच तपासणीदरम्यान कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून न देणे, अशा गंभीर त्रुटी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. राज्यभर विक्री झालेल्या संबंधित बियाण्यांची तपासणी मोहीम राबवून दोषी साठा जप्त करावा, अशी मागणीही कडू यांनी केली..Soybean Seeds Fraud: पश्चिम विदर्भात सोयाबीन बियाण्यांचा ‘फसवा खेळ’!.बियाणे अधिनियमात बदलांची मागणीबोगस किंवा निकृष्ट बियाणे आढळताच संबंधित कंपनीने मोफत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे.पेरणी, मशागत, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि उत्पादनातील नुकसानीची संपूर्ण भरपाई कंपनीकडून वसूल करण्याची कायदेशीर तरतूद करावी.प्रति एकर किमान दोन लाख रुपये नुकसानभरपाई बंधनकारक करावी.दोषी कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची स्पष्ट तरतूद करावी..शेतकऱ्यांच्या घामाची लूट करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये जाळून टाकू. शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही.आमदार बच्चू कडू.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.