Bacchu Kadu Joins Shiv Sena News Updates: प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आज गुरुवारी (दि. ३० एप्रिल) मुंबईत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर शिंदे यांनी लगेच विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून बच्चू कडू यांच्या नावाची घोषणा केली. .निव्वळ आमदारकीसाठी नव्हे तर दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. ''जिथे आहे, तिथे प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आमचा प्रवास शिंदेंच्या नेतृत्त्वात राहील. शिंदेंचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री दोन वाजता सुद्धा वर्षा बंगल्याची दारे खुली होती. त्यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहसिक निर्णय घेतला. त्यांनी कर्जमाफीच्या निर्णयात घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.'' असे कडू यांनी म्हटले आहे..Maharashtra Politics: बच्चू कडू यांना शिवसेनेची विधान परिषदेची ऑफर.ही लढाई केवळ पदापुरती मर्यादित राहणार नाही. तर आम्ही जे मुद्दे दिले आहेत; त्यात दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण, शेतकरी, शेतमजुरांची सर्व कामे, हमीभावाची लढाई या सर्व मुद्यांवर चर्चा करुन मी निर्णय घेतला. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावले टाकेल. तर राजकारण शिवसेनेचे राहील. पक्ष मजबूत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे बच्चू कडू यांनी आश्वासन दिले आहे. .Bacchu Kadu: शेतकरी कर्जमाफीत प्रोत्साहन निधी वाढवून द्यावा लागेल, अन्यथा आंदोलन, बच्चू कडूंचा इशारा.एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रहार ही सामाजिक संघटना आहे. ती राजकीय संघटना नाही. ही संघटना आता शिवसेनेशी संलग्न राहील. आता प्रहार संघटनेला बळ मिळेल. मी मुख्यमंत्री असताना बच्चू कडू यांच्या मागणीनुसार, दिव्यांग मंत्रालय सुरु केले. त्याचा फायदा दिव्यांगांना होत आहे. त्याचबरोबर कष्टकरी शेतकरी आणि गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्यावेत. एकनाथ शिंदे आपल्या गंभीरपणे पाठीशी आहे. हा शब्द आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी कडू यांना दिली. .शिवसेनेकडून दोघांना उमेदवारीदरम्यान, शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना विधानपरिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांची घोषणा केली. बुधवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेतला असल्याचे शिंदेंनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.