Kolhapur News : हवामानाच्या संभाव्य धोक्याची माहिती गावातच मिळण्यासाठी जिल्ह्यातील १०३२ पैकी ९९६ ग्रामपंचायतींकडून स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केले जात आहे. आतापर्यंत ७५ ग्रामपंचायतींनी हे केंद्र सुरू केले आहे. उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींनी जागा निवडली आहे. तर, ४२३ ग्रामपंचायती हवामान केंद्रांसाठी जागा शोधत आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत जागा निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत..जिल्ह्यात केंद्र सरकारच्या हवामान ‘विंड’ (वेदर इर्न्फमेशन नेटवर्क डाटा सिस्टिम) प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र सुरू केले जात आहे. हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, पुराचे संकट आणि पिकांचे होणारे नुकसान यामुळे ग्रामीण भागात वेळेवर माहिती मिळणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील १०३२ पैकी ९९६ ग्रामपंचायतींकडून स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..Automatic Weather Station : धुळ्यातील ५१८ ग्रामपंचायतींना हवामान केंद्रे.हवामान केंद्रांमधून मिळणारी दररोजची माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पावसाचे प्रमाण, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यांची अचूक नोंद मिळाल्याने पेरणी, खतांचा वापर, कीटकनाशक फवारणी आणि पिकांना पाणी देणे यासंबंधी शास्त्रशुद्ध निर्णय घेता येतील. कीड, रोग नियंत्रण आणि बाजारपेठेत नियोजनबद्ध आवक करण्यास मदत होईल. अचानक येणाऱ्या पावसाचा अंदाज मिळाल्याने पिकांचे नुकसानही टाळता येणार आहे..Automatic Weather Station : आता गावातच कळणार हवामानाचा अंदाज.कोल्हापूर जिल्हा दरवर्षी पुराच्या झळा सोसतो. अशावेळी हवामान केंद्राकडून वेळेवर मिळणाऱ्या पावसाच्या इशाऱ्यामुळे पूरग्रस्त भागात स्थलांतर, शाळा-बाजार बंद करण्याचे निर्णय योग्यवेळी घेता येतील. आरोग्य केंद्रे व प्रशासनाला पूर्वतयारी करता येईल. यात्रास्थळे, नदीकाठची गावे यांना सुरक्षिततेसाठी अलर्ट देणे सुलभ होईल. केंद्रातून मिळालेली माहिती ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, मंदिर, डिजिटल बोर्ड यांच्यामार्फत गावकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. .याशिवाय मोबाईलवर एसएमएस, व्हॉट्सअॅप गट आणि सोशल मीडियाद्वारेही माहिती देण्याची योजना आहे. गावोगावी हवामान केंद्र कार्यरत झाल्याने शेतकरी निर्णयक्षम होतील, नागरिकांना आपत्तीपासून आधीच बचाव करता येईल आणि प्रशासनालाही मदत मिळेल. लवकरच सर्व ९९६ ग्रामपंचायतींत ही केंद्रे सुरू झाल्यानंतर जिल्हा राज्यातील आदर्श हवामान माहिती प्रणाली म्हणून ओळखला जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.