आबाजी ऊर्फ मिलिंद रंगराव पाटीलTrue Farmer: या लेखाच्या निमित्ताने यातल्या प्रत्येक शेतकऱ्याने माझं अनुभवविश्व समृद्ध केलंय. अस्सल शेतकरी शोधावाच लागतो, हे पटलंय. तो बुजरा आहे. कारण तो मनस्वी आहे. तेवढाच आतून खंबीर. जातिवंत शेतकरी हा जसा निसर्गाला जवळचा आहे, तसाच तो मानवी नैसर्गिक भावनांनी काठोकाठ भरलेला असतो. तो अघळ पघळ आहे. त्याच्या डोक्यात गोंधळ नसतो. आतलं एक बाहेरच एक त्याला जमत नाही. म्हणून तो रोखठोक असतो. दानत ही त्याची वृत्ती असते. निसर्गाकडे तो खिलाडू वृत्तीने पाहतो. त्याच्यावर वैतागत नाही. सगळ्या गोष्टीला आपली मानवजात कशी जबाबदार आहे याचं त्याला भान आहे, पण तो प्रबोधन करण्यापेक्षा बदलाची सुरुवात स्वतःपासून करतो. नवं शिकत राहतो..जुन्या चुकांची स्वच्छ कबुली देतो. निसर्ग- पाणी- माती यांना आता नेमकं काय हवं आहे याबद्दल तो जाणून आहे. कारण या सर्वांशीच त्यांचं सर्वांत घनिष्ठ नातं आहे. या सर्वांच्या सान्निध्यात तो एक समृद्ध माणूस बनत जातो. तो दयावान होतो. त्याच्या शेतमातीबरोबर त्याचे विचारसुद्धा शुद्ध बनत जातात. कुटुंब, समाज याकडे सुद्धा तो आपल्या उभ्या पिकाकडे पाहावं तसा पाहतो. त्यातला त्याला रोग कळतो आणि कीडही दिसते. .Agrowon Diwali Article: माळरानावर रुजविले हिरवाईचे स्वप्न....त्याला तशी विशेष नजर आहे. तो अकारण भेदरून जात नाही. आपण खूप महत्त्वाचं काम करतोय हे तो जाणतो. जगाच्या मुखी अन्न घास भरवणारा तो परमेश्वराचा हात असतो. हे तो निगर्वीपणे ध्यानात ठेवतो. खरं तर तो सर्व काही आहे. पण चमचमत्या जगात त्याचा उल्लेख टाळला जातोय. त्याची किंमत ठरवणारे खरे पारखी त्याला भेटत नाहीत. मातीत पेरलेलं बीज, त्याचं जोमदार पीक ते भटारखान्यात शिजणाऱ्या अन्नापासून चकचकीत डिशमध्ये वाढून घेतलेल्या पदार्थांपर्यंत त्याचं अस्तित्व आहे..Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन.मग जेवताना त्याचं भान असायला हवं ना? आलिशान पार्टीत बिझनेसच्या चढत्या आलेखाचा कार्पोरेट लेखाजोखा सांगताना तो तिथेच तुमच्या ताटात असतो. अखिल जगताच्या भुकेच्या मुळाशी आहे ..म्हणून तो सर्वव्यापी आहे. सर्वांच्या यशात त्याचा वाटा आहे. पण कुणाला हे केवढं ज्ञात आहे? भाव पाडून त्याचा माल पदरात पाडण्याचा स्मार्टनेस इथे भिनलाय ना? ही विचार करण्यासारखी खंत वाटतेय का?(संपूर्ण लेख वाचा २०२६ च्या ॲग्रोवन दिवाळी अंकात).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.