Latur News : आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने जलसमृद्ध औसा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाला आता शिरपूर पॅटर्नचे बळ मिळाले आहे. पॅटर्नचे मुख्य शास्त्रीय मार्गदर्शक, ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ तथा जलसंधारण तज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर यांनी शुक्रवारी (ता. २९) भर पावसात तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. .सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा जलतज्ज्ञ अंबादास जोशी व आमदार पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. हिप्परगा, कवळी व माळकोंडाजी, दावतपूर, मोगरगा व तांबरवाडी या गावांना भेट देऊन डॉ. खानापूरकर यांनी जलसंधारणाशी निगडित बाबींचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. .Water Conservation : बीव्हरमुळे तलावाचे पुनरुज्जीवन.शिरपूर पॅटर्नच्या यशामागील गमक त्यांनी सर्वांना उलगडून दाखवले. जलसमृद्ध औसा अभियानाच्या माध्यमातून जलसंधारण आणि उत्तम जलव्यवस्थापन प्रणाली विकसित करून शेतकऱ्यांच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला असल्याचे सांगत डॉ. खानापूरकर यांनी भविष्यात पाणी नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले..Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न .आमदार पवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात या अभियानाअंतर्गत दहा वर्षांत काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरवर्षी वर्षांत किमान दहा ते पंधरा गावात या अभियानांतर्गत काम होणार असून या कामासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे..मतदारसंघ जलसमृद्ध करण्याचे हे लोककल्याणकारी काम असून सर्वीनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत युवक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या सहभागातून अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.