Pune News: वयाच्या साठीनंतर शहरातली माणसं छानपैकी बागेत फिरायला जातात आणि निवृत्तीनंतरच्या गप्पांत रमतात. मात्र, या जीवनशैलीला श्रीमती ताराबाई बबन चव्हाण या अपवाद ठरल्या आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी शेतमजुरी सोडून बांगडी विक्रेता म्हणून दुसरे ‘करिअर’ जिद्दीने सुरू केले. त्यासाठी आवश्यक ती सारी कौशल्य शिकून, त्या बांगड्या विकण्यासाठी विविध गावांत आनंदाने फिरत आहेत..ताराबाईंना गणेश व संदीप अशी दोन मुले. शेतमजुरी करताना त्यांना रोजचे २००-३०० रुपये मजुरी मिळायचे. त्यासाठी त्या सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबायच्या. परंतु, कष्टाच्या तुलनेत त्यांना पुरेसा पैसा मिळत नव्हता. त्यामुळे ताराबाईंनी काम बदलण्याचा किंवा दुसरा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला..Women Entrepreneur: खवा, कष्ट आणि कल्पकतेची प्रेरक कहाणी.मात्र, वयाच्या सत्तरीला सामोरे जाताना दुसरे काम शोधण्याची किंवा नव्या व्यवसायाचे तंत्र शिकण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. ताराबाईंनी मग चक्क बांगड्या विक्रीचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांनी बांगड्या कोठून आणायच्या, कुठे विकायच्या, विक्रीची तंत्र कोणती, असे धडे घेण्यास सुरुवात केली. शिकण्यासाठी त्या इतर बांगडी विक्रेत्यांकडे जाऊ लागल्या. मग त्यांनी प्लॅस्टिकच्या बांगड्या आणि शोभेच्या चांदीच्या पायातल्या पट्ट्या विकण्याचा निर्णय घेतल्या..‘‘मी माझा रायगड जिल्हा सोडून इतर गावांमध्ये बांगड्या विक्रीसाठी जाते. गावात कोणत्याही एका गल्लीत टोपली घेऊन उभे राहिले की बायका जमतात. जरा वेळ लागतो, पण माझा सर्व माल खपतो. पाच हजारांचा माल विकल्यावर मला ३-४ हजार रुपयांचा नफा मिळतो. तो एकत्र करून मग मी थेट मध्य प्रदेशात भोपाळला बांगड्यांच्या कारखान्यांमधून स्वस्तात बांगड्या खरेदी करते..Women Entrepreneurs : मिलेट्स नूडल्स ते आरोग्यदायी सरबत ; मराठवाड्यातील महिलाशक्तीचा यशस्वी प्रवास.साहित्याचे जड बोजके रेल्वे, एसटी, टेम्पो, रिक्षातून वाहून नेत मला गावापर्यंत जावे लागते. माझी दोन्ही मुले आणि सुना प्रेमळ आहेत. मात्र, कोणावरही अवलंबून न राहता मुक्तपणे जगावे. स्वतः कमवून स्वतः हवे ते खावे, असे मी ठरवले. त्यामुळे मुले नको म्हणत असतानाही मी शेतमजुरी केली. आता हा बांगडी विक्रीचा व्यवसाय करते आहे,’’ असे ताराबाई सांगतात..असे गावोगाव भटकंती कशीसाठी, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, की काही लोकांना कष्टात सुख मिळतं. अनेक शेतकरी अन्नधान्य विकत आणून दुसरा व्यवसाय करूनही चांगले जगू शकतात. परंतु, ते दिवसभर शेतात राबतात. त्यांना कष्टात समाधान मिळतं. माझेही तसंच आहे. मला काम केल्याशिवाय चैन पडत नाही. व्यायाम होत त्यामुळे तब्येत चांगली राहते..कष्टाचा पैसा देश पाहण्यात घालवते‘‘आधी शेतमजुरी आणि आता गावोगावी बांगड्या विकून मिळवलेला पैसा मी देशातील विविध भागांना भेटी देण्यात घालवला आहे. मला यात्रा करण्याची आवड आहे. त्यामुळे लोकं कळतात आणि जगण्यासाठी प्रेरणा मिळते,’’ असे ताराबाई सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.