Akola News : महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेच्या गेल्या संपकाळातील वेतन नियमित करण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ९) मुंबईत आयोजित बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास रिंढे व पदाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर निवेदन श्री. भरणे यांना दिले..आमदार संजय खोडके, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुजित मांढरे, संचालक रफिक नाईकवाडी, उपसचिव श्री. चंदनशिवे, कक्षाधिकारी श्री. खोकले यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष श्री. रिंढे, उपाध्यक्ष शरद सुरळकर, सरचिटणीस महेंद्र गजभिये, कोषाध्यक्ष वसंत जारीकोटे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष अमोल धामणकर, सातारा प्रतिनिधी नितीन सोनवलकर आदी उपस्थिती होते..संघटनेने म्हटले आहे, की १५ ते २७ मे या कालावधीत प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने कामबंद आंदोलन केले होते. याची दखल घेऊन कृषिमंत्र्यांनी काही मागण्यांचे निराकरण केले. शिवाय उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. .Agriculture Department : कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषिमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संघटनेने आंदोलन स्थगित केले. यानंतर सहायक कृषी अधिकारी पुन्हा कामावर रुजू होऊन प्रलंबित कामकाज पूर्ण करीत आहेत..Agriculture Department: टॅब खरेदीच्या हालचाली शंकास्पद.वेतनाबाबत विसंगतीराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनकाळातील वेतन आधीच अदा करण्यात आले आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांत अद्याप हे वेतन मिळालेले नाही. यामुळे मोठ्या संख्येने सहायक कृषी अधिकारी आर्थिक अडचणीत आहेत. .तरी संपकाळातील कालावधी नियमित करून संबंधित अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज मंजूर करण्यात यावेत आणि वेतन तत्काळ अदा करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे..कृषिमंत्र्यांनी न्याय्य मागण्यांची सोडवणूक करण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता आंदोलन काळातील वेतनही नियमित करून सहायक कृषी अधिकाऱ्यांना दिलासा द्यावा. अनेक ठिकाणी या काळातील वेतन झालेले नाही.- विलास रिंढे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.