Women Support: महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एक मजबूत पाऊल टाकले आहे. मतदारसंघातील गावांमध्ये बचत गटाच्या महिलांना सर्व सुविधा असलेल्या एका इमारतीतून हक्काची इमारत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नवी संकल्पना पुढे आणली आहे. यातूनच मतदारसंघातील ९३ गावांमध्ये बचत गटाच्या महिलांसाठी महिला अस्मिता भवन उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ४० अस्मिता भवनासाठी विविध योजनांतून १६ कोटी ८८ लाखाचा निधी मंजूर झाला असून सर्व भवनासाठी पवार यांनी आमदार फंडातून प्रत्येकी दहा लाख रुपये दिले आहेत, हे विशेष होय. राज्यातील ही पहिलाच उपक्रम आहे. .काही वर्षात महिला बचत गटांच्या चळवळीची व्याप्ती वाढली असून ग्रामसंघाच्या छताखाली अनेक बचत गट व महिला एकत्र येऊन विविध उपक्रम राबवत आहेत. यात बचत गटांकडून उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी कायम जागाही गरजेची होती. बचत गटांच्या महिलांना मिटींग घेण्यापासून विविध उपक्रमांसाठी हक्काची जागा आवश्यक होती. अन्य सार्वजनिक इमारतीमध्ये उपक्रमासाठी गैरसोय व अडचणीचे झाले होते. .Women Empowerment: एकही कुटुंब बचत गटांपासून वंचित राहू नये.हक्काची जागा व इमारत नसल्यामुळे महिला सक्षमीकरणाला खीळ बसत असल्याचे आमदार पवार यांच्या लक्षात आले. मागील काही वर्षात आमदार फंडातून शेतरस्त्याचा पॅटर्न राबवणाऱ्या पवार यांनी आता महिला सक्षमीकरणासाठी आमदार फंड खर्च करण्याचा निर्णय घेत ग्रामसंघ इमारत - महिला सक्षमीकरण भवन अर्थात अस्मिता भवनाची संकल्पना मांडली व तसा प्रस्ताव सरकारला दिला. एका भवनाच्या इमारतीसाठी ४२ लाख २० हजार रुपये निधीची आवश्यकता होती..यासाठी त्यांनी विविध योजनांचा मेळ घालून निधी उपलब्ध केला. यात आमदार निधीतून दहा लाख, जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून १५ लाख आणि मनरेगा व रोहयो अभिसरण निधीतील प्रत्येकी १७ लाख २० लाख रुपये निधीचा समावेश आहे. तीन योजनांतील निधी एकत्रित करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला. सरकारच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने उपक्रमाच्या निधीला मान्यता दिली..Women Empowerment Story: महिला गटातून प्रक्रिया उद्योगाला चालना.बचत गट उत्पादनांच्या विक्रीची सुविधाअस्मिता भवनच्या रचनेत ग्रामसंघाच्या अध्यक्षांसाठी सुसज्ज केबिन, प्रशस्त मीटिंग हॉल, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी दोन गाळ्यांचा समावेश असणार आहे. भवनामुळे महिलांना एकाच छताखाली बैठका, नियोजन आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होणार आहेत..तीन योजनांचे एकत्रीकरणातून निधी उपलब्ध करण्यासोबत आमदार निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून महिला अस्मिता भवनाच्या उपक्रमाचा निधी मंजूर करण्याची तरतूद नव्हती. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला. आठ डिसेंबर २०२५ रोजी तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्याकडे आमदार पवार यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या उपक्रमाला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानंतर २४ मार्च रोजी अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. शेरस्त्यांनंतर अस्मिता भवनाचा औसा पॅटर्न राज्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत नवा अध्याय सुरु करेल.- आमदार अभिमन्यू पवार, औसा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.